शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांची दुकाने सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:55 IST

फॅन्सी फटाके अ‍ॅटमची धुम; इतर शहरांपेक्षा कमी दराने

- वसंत भोईरवाडा : ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यातील प्रत्येक शहरांमध्ये फटाक्यांचे घाऊक व किरकोळ विक्रेते असतातच मात्र वाडा शहरातील फटाके व्यापा-यांकडे विक्रेत्यांचा ओढा असतोे. वाजवी दर असल्यामुळे व्यापा-यांचा ओढा वाड्याकडे आहे. थेट कारखान्यातून येथे माल येत असल्याचे इतर शहरांपेक्षा कमी दराने फटाके मिळतात असे व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. येथील फटाक्यांच्या व्यापाऱ्यांनी वाड्याला एक नवी ओळख करून दिली आहे.पूर्वी फटाक्यांचा धंदा हा दिवाळी सणापुरताच मर्यादित होता.मात्र आता हा धंदा बारमाही झाला आहे. विविध सण, लग्न समारंभ, विविध राजकीय पक्षांच्या सभा, निवडणूका, नागरिकांचे विविध कार्यक्रम अशा प्रत्येक वेळी फटाक्यांची गरज असल्याने हा धंदा आता बारमाही झाला आहे. दिवाळी साठी फटाक्यांची दुकाने सजली असून यावर्षी फॅन्सी अ‍ॅटमची धूम आहे.दिवाळी सण हा चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने फटाके विक्र ेते व किरकोळ ग्राहक यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. तामिळनाडूतील शिवा काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून थेट फटाक्यांच्या माल वाड्यात आणला जातो. येथील सर्वात प्रमुख व्यापारी म्हणून दिलीप ट्रेडर्स ची गणना केली जाते. दिलीप ट्रेडर्स हे वाड्यातील सर्वात मोठे व्यापारी. त्यांचे सर्व कुटुंब या व्यवसायात असून इतर २५ ते ३० कामगार असून सकाळी ८ ते रात्री पर्यंत हे दुकान दिवाळी च्या हंगामात सुरू असते. या खालोखाल प्रितम ट्रेडर्स हे व्यापारी आहेत. गणपती पासून दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पर्यंत घाऊक विक्र ेत्यांची गर्दी असते. त्यानंतर किरकोळ विक्रेते व ग्राहक फटाके खरेदी करतात अशी माहिती व्यापा-यांनी दिली. प्रितम सेल्स एजन्सी, सिद्धिविनायक ट्रेडर्स, प्रसाद ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स ही घाऊक फटाक्यांची दुकाने दिवाळीच्या वेळेस दिवस रात्र सुरू असतात. दिवाळीत करोडोचा व्यवसाय होत आहे. वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या भावात वाढ, मजुरीचे वाढलेले दर व इंधनाच्या दरातील वाढ यामुळे फटाक्यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.सुतळी बॉम्ब, फुलबाजा, अ‍ॅटम बॉम्ब, जमीन चक्र , अनार, लवंगी फटाकडी इत्यादी प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मल्टी शॉट, १२० शॉट, २४० शॉट याची किंमत २०० पासून १५०० पर्यंत, फुलबाजा ५ रूपयापासून २५० पर्यंत हजाराची माल २०० पासून ५०० पर्यंत अशा किंमती आहे.फॅन्सी आयटेमला मागणीसध्या फॅन्सी अ‍ॅटमला मागणी जास्त असून त्याचीच धूम आहे. फॅन्सी अ‍ॅटमची किंमत ५० रूपयापासून ५००० रूपयापर्यत आहे .यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलर गोळी, वंडर लाईट, स्वस्तीक व्हील, लाईटींग थंडर, मल्टी शॉट, मल्टी बार, रॉबेट, डान्सिंग, पॅराशुट, कलर बॉल, स्कॉचवे, हॅण्ड्रेड शॉट आदी रंगीबेरंगी फटाक्यांना मागणी आहे.

 

टॅग्स :fire crackerफटाकेVasai Virarवसई विरार