बोर्डी (पालघर) : गणवेश भत्याचे चारशे रुपये मिळविण्यासाठी आदिवासी पालक व पाल्यांची फरफट थांबता-थांबत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे डहाणू तालुक्यातील शिक्षक, आदिवासी विद्यार्थी व पालकांचे शोषण सुरूच आहे.तालुक्यातील खेडोपाडी सर्वच भागात अद्याप बँकांचे जाळे पसरलेले नाही. काही शाखांमध्ये जिरो बॅलन्सचे खाते उघडण्यास स्पष्ट नाकारले जात असल्याने निम्मी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून शिक्षकांकडे विचारणा केली जात असून त्यांच्याकडून पालकांना सूचना दिल्या जात आहेत. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी इयत्तेमधील आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेद्वारे एका शैक्षणिक वर्र्षाकरिता अनुक्रमे एक हजार आणि दीड हजार रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेकरिता उघडलेल्या बँक खात्यांचा वापर गणवेश भत्ता जमा करण्यासाठी झाल्यास प्रक्रि या सुरळीत राबविली जाईल. संयुक्त खाती उघडण्याचा आग्रह विनाकारण धरला जात आहे. ही परिस्थिती न बदलल्यास दुसºया सत्रात विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळू शकेल. त्यामुळे प्रत्येक केंद्र शाळेत बँक कर्मचाºयांना बोलावून खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची गणवेश भत्ता मिळविण्यासाठी फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:43 IST