शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

अखेर तुळजापुरात सापडल्या नायगावच्या तिन्ही मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 02:41 IST

स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सोडली होती घरे

नालासोपारा : नायगावच्या चिंचोटी परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. अखेर त्या तिन्ही मुली वालीव पोलिसांच्या टीमला तुळजापुरात सापडल्या असून ३६ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

नायगावच्या चिंचोटी परिसरातील दळवीपाडा येथील भाबीपाडा चाळीत राहणारे मुन्नासिंग रामधनी चव्हाण (३९) यांची अल्पवयीन मुलगी कांचन (१२), तिच्या मैत्रिणी प्रियंका (१५) आणि कविता (१३) या घरातील कोणालाही काहीही न सांगता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निघून गेल्या होत्या. या प्रकरणी वालीव पोलिसांनी पथक स्थापन करून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मुलींचा तपास करताना एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडला. त्या माहितीवरून पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मुलींना तुळजापूरला सोडल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नवले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हवालदार तोत्रे आणि कोकणी यांची टीम गेली होती. या मुलींचा फोटो घेऊन प्रत्येक ठिकाणी शोधाशोध सुरू केली. या तिन्ही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये थांबल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तिन्ही मुलींना ताब्यात घेण्यात  आले.

तिघींनीही घरातून लांबवले पैसेn एका मुलीने घरातून २७ हजार, दुसऱ्या मुलीने १ लाख, तर तिसऱ्या मुलीने २० हजार अशी रोख रक्कम घेऊन लग्न न करता स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी घरातून जात असल्याची चिठ्ठी लिहून तिन्ही मैत्रिणी निघून गेल्या होत्या. सध्या तिन्ही मुलींना पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतले असून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‌‘लोकमत’ला सांगितले.   

टॅग्स :Vasai Virarवसई विरार