शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अखेर लोकशक्ती एक्स्प्रेसला उंबरगाव स्थानकात थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:25 IST

सीमा भागात प्रवाशांचा जल्लोष : रहिवाशांकडून होणार स्वागत सोहळा ; पालघर, गुजरात, राजस्थानच्या खासदारांचे प्रयत्न फळाला

- अनिरुद्ध पाटील

डहाणू : पश्चिम रेल्वेच्या उंबरगाव रेल्वे स्थानकात रविवार, २४ फेब्रुवारीपासून लोकशक्ती एक्स्प्रेसला एका मिनिटाचा थांबा पुढील सहा महीने प्रयोगिक तत्वावर दिला जाणार आहे. हे स्थानक महाराष्ट्र गुजरात या सीमा भागात असून या सुविधेमुळे प्रवाशी समाधानी असून एका कार्यक्र माच्या आयोजनातून हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनल्स ते अहमदाबाद दरम्यान लोकशक्ती एक्स्प्रेस धावते. ही क्र मांक २२९२७ ची गाडी बांद्रा येथून सुटल्यानंतर विविध स्टेशन घेत डहाणू रोड स्थानकात रात्री दहाच्या सुमाराला पोहाचते. त्यानंतर थेट वापी स्थानकात थांबात होती. मात्र रविवार, २४ फेब्रुवारीपासून १०:१६ वाजता उंबरगाव स्थानकात पोहचल्यानंतर एक मिनिटभर थांबून पुढे जाणार आहे. तर क्र मांक २२९२८ ही अहमदाबाद स्थानकाहून सुटल्यानंतर पहाटे ३:२३ वाजता या स्थानकात पोहचल्यावर मिनिटभर थांबणार आहे. मागील एका दशकांपेक्षा अधिक काळापासून या गाडीला थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी लिखित सामूहिक निवेदनं रेल्वे प्रशासनाला दिली आहेत.हे स्थानक दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. उंबरगाव हे औद्योगिक शहर असून मुंबई आणि उपनगरहून अनेक कामगार येथे येतात. शिवाय येथे समुद्र किनाऱ्यालगत वृंदावण स्टुडिओ असून पौराणकि चित्रपट व मालिकांकरीता बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध आहे.

रात्री व पहाटेच्या शूटिंगकरिता बाहेरून येणाºया कलाकार-तंत्रज्ञांना त्याचा फायदा होणार आहे. तर सर्वाधिक फायदा तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना होणार आहे. कारण डहाणू रोड रेल्वे स्थानकापेक्षा हे जवळचे व सोयीचे आहे. रात्री ९:२० च्या सुमारास मुंबईहून येणारी बलसाड फास्ट पॅसेंजर येथे थांबते.

त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास विरमगाम पॅसेंजर थांबते. त्यामुळे डहाणू रोड स्थानकापर्यंत उपनगरीय सेवा असली तरी तलासरीतील नागरिकांना त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आदिवासी बांधव मुंबईकडे नोकरीकरिता जाऊन रात्री घरी पोहचू शकतात. नोकरीकरीता होणारे आदिवासींचे स्थलांतर थांबण्यास त्याचा हातभार लागू शकतो.दरम्यान, स्थानिकांप्रमाणेच उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे गिरीश राव, साहिर व्होरा, प्रशांत कारु ळकर यांनी रेल्वे मंत्रालयाला लिखित निवेदने दिली.सामूहिक प्रयत्नांना यश, रोजगारांचा प्रश्न मार्गीगुजरातचे खासदार डॉ. के. सी. पटेल, राजस्थानचे खासदार देवजी पटेल, मंत्री रमण पाटकर, पालघर खासदार राजेंद्र गावीत, आमदार पास्कल धणारे यांनी प्रयत्न केले. या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असल्याची स्थानिकांची भावना आहे.याचा स्थानिकांना लाभ होणार असून अनेक शिक्षित तरु ण नोकरी करिता बाहेर पडतील असे अनिलकुमार पांडे म्हणाले तर उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून या बाबत रेल्वे मंत्रालयाला निवेदनं देण्यात आल्याचे प्रशांत कारूळकर म्हणाले.