शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

... अखेर बाणगंगा पुलाला मुहूर्त सापडला

By admin | Updated: November 28, 2015 22:35 IST

तारापुर अणुऊर्जाचे दोन प्रकल्प व भाभा अणुसंशोधन केंद्रा (बीएआरसी) चा प्रकल्प तसेच बोईसर ते तारापुर-चिंचणी- डहाणूसह सुमारे पन्नास गाव-पाड्यात जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या

- पंकज राऊत,  बोईसरतारापुर अणुऊर्जाचे दोन प्रकल्प व भाभा अणुसंशोधन केंद्रा (बीएआरसी) चा प्रकल्प तसेच बोईसर ते तारापुर-चिंचणी- डहाणूसह सुमारे पन्नास गाव-पाड्यात जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या अशा बोईसर-तारापूर रस्त्यावरील बाणगंगेवर अतिरीक्त पूल बांधणीचे काम अखेर शुक्रवार (दि. २७) पासून सुरू करण्यात आले आहे. तर हा कमकुवत पूल धोकादायक स्थितीत असून तो नव्याने बांधण्याची नितांत गरज असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. सात मीटर रूंद व प्रत्येकी साडेसात मीटरच्या तीन गाळ्यांचा साडेबावीस मीटर लांबीचा हा पूल बाणगंगेवर बांधण्याकरीता न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशनने (एनपीसीआयएल) टीएम्सी/सीएसआर/२०११ पत्रान्वये दि. २८ आॅक्टोबर २०११ रोजी प्रशासकीय मान्यता देऊन ५४ लाख ८७ हजार २४५ रू. रक्कमेस तांत्रिक मान्यता दिली. त्यानुसार अणुऊर्जा केंद्राच्या एनपीसीआयएलने त्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीतून (सीएसआर) ८३३२०८ या क्रमांकाच्या धनादेशाद्वारे दि. १९ जाने. २०१२ रोजी कार्यकारी अभियंता ठाणे सार्वजनिक विभाग ठाणे यांना निधीही देण्यात आला होता.एनपीसीआयसी ने पूल उभारणीकरीता लागणारा संपूर्ण निधी सा. बा. खात्याला दिला असताना तसेच त्याचे भूमीपूजन माजी आदिवासी विकासराज्यमंत्री राजेंद्र गावितांनी २७ डिसेंबर २०१२ रोजी केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी सा. बा. खाते व अणुऊर्जा प्रशासनाकडून निर्माण झाल्या. दोन्ही मधल्या समन्वयाचा अभाव लालफितीचा गोंधळ सध्याच्या पुलाजवळून गेलेल्या ३३ के. व्ही. क्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरास झालेला विलंब इ. अनेक कारणामुळे नवीन पुलाचे बांधकाम खोळंबले. पूल बांधणीचा खर्च रू. १८ लाख ३६ हजाराने वाढला. या वाढीव खर्चास अजून मान्यता मिळाली नसल्याचे समजते हा वाढीव खर्चाचा भुर्दंड कोणाच्या माथी टाकणार हा ही प्रश्न असून २०१२-१३ च्या टेंडर नुसारच हे काम करण्यात येणार आहे. पूल बांधणीचे काम शिवसाई एजन्सी करणार आहे पूल बांधणीची मुदत सहा महिन्याची आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभितीत बांगर यांनी सव्वा वर्षानंतर खऱ्या अर्थाने २० नोव्हेंबर २०१५ रोजी तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय आपत्कालीन उपाययोजना समितीची बैठक घ्ोतली. त्यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक शारदा राऊत, अणुऊर्जा केंद्राचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत अणुऊर्जा केंद्रातील आकस्मित दुर्घटनेच्या परिस्थितीत किरणोत्सर्गाच्या संसर्गापासून परिसरातील नागरीकांचा जलद बचाव करण्यासाठी अणुकेंद्राला जोडणाऱ्या मार्गाचे रूंदीकरण प्राधान्याने हाती घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाला जाग येऊन अखेर खोळंबलेल्या बाणगंगेवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.- बाणगंगा पुलाखालील काँक्रीट उखडून लोंबकळणाऱ्या सळ्या, पुलाच्या स्ट्रक्चर बरोबरच कठड्याची झालेली भयावह स्थिती, क्षमतेपेक्षा जास्त पुलावरून वाहत असलेली अवजड वाहने, पूल कोसळल्यास अतिसंवेदनशील अणुप्रकल्पाबरोबरच पन्नास गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता तसेच ब्रिटीश कालीन बांधण्यात आलेल्या पुलाचे संपलेले आयुष्यमान, अणुकेंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुलाचे असलेले महत्व या सर्व गंभीर बाबी लोकमतच्या माध्यमातून अनेक वेळा निदर्शनास आणून दिले होते. तर पास्थळचे उपसरपंच गणेश घरत यांनीही हा पूल बांधण्याकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा सा. बा. खात्याकडे पत्रव्यवहार केला होता.