शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

मिठागरावर मातीचा भराव : वसई महापालिकेवर हायकोर्टाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:37 IST

दिवाणमान येथील मीठागराच्या जागेवर मातीचा भराव करून त्याठिकाणी बांधकाम करणाºया वसई विरार महापालिकेवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : दिवाणमान येथील मीठागराच्या जागेवर मातीचा भराव करून त्याठिकाणी बांधकाम करणाºया वसई विरार महापालिकेवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत. याप्रकरणी काय कारवाई केली याची जागेवर जाऊन पाहणी करून माहिती सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.वसई युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी तक्रार केल्यानंतर वसई पश्चिमेला दिवाणमान येथील सरकारी मालकीच्या सर्व्हे क्रमांक १७६ व १७६ अ या मिठागर असलेल्या खाजण जमिनीवर २०१५ मध्ये महापालिकेने ठेकेदारामार्फत ४ हजार ३८० ब्रास मातीचा भराव केल्याचे तलाठ्याच्या पंचनाम्यानंतर उजेडात आले होते. याप्रकरणी तहसिलदारांनी महापालिका आणि ठेकेदाराविरोधात जमीन हस्तांतरण कायद्यांतर्गत बेकायदा माती भराव केल्याप्रकरणी १ कोटी ५ लाख रुपये दंडाची नोटीसह बजावली होती. महापालिका अथवा ठेकेदाराने अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. याबाबत विभागीय कोकण आयुक्तांनीही दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने कुलदीप वर्तक यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. माती भराव हटवण्यात यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे. या भरावामुळे लोकवस्ती असलेल्या परिसरात पावसाचे पाणी साचून लोकांची गैरसोय होत असल्याची बाब अ‍ॅड. इंद्रजित कुलकर्णी यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने महापालिकेने काय कारवाई केली.महापालिका आयुक्तांना जागेची पाहणी करण्याचेही बजावण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले.वसई तहसिल कार्यालयाची परवानगी न घेताच बेकायदा माती भराव करून सरकारी भूखंडावर बांधकाम केल्याप्रकरणी महापालिका आता अडचणीत सापडली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयVasai Virarवसई विरार