शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यातील फोटोग्राफीला आता लागणार शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:46 IST

मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील गैरधंद्यांविरोधात पुरातत्व विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे.

शशी करपेवसई : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील गैरधंद्यांविरोधात पुरातत्व विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. मद्यपी, प्रेमी युुगुल आणि गैरधंदे करणाºयांना हुसकावून लावण्यासाठी विभागाचे २६ कर्मचारी किल्ल्यात तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रि वेडींग (विवाहपूर्व) आणि इतर व्यावसायिक फोटोग्राफीसाठी आता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगत असलेल्या वसई किल्ल्यातील गैरप्रकारांविरोधात दुर्ग प्रेमींसह अनेक दुर्ग संवर्धन संघटनांनी विविध मार्गाने आंदोलने सुरु केली आहेत. दुर्गप्रेमींनी गेल्या काही महिन्यांपासून किल्ल्यात सफाई मोहिम, मद्यपी, प्रेमी युुगुलांविरोधात मोहिम, इतिहास ताजा ठेवण्यासाठी किल्ले सफर अशा माध्यमातून वसई किल्ला संवर्धनाचे काम सुरु ठेवले आहे. त्याची दखल घेऊन आता पुरातत्व विभागाने किल्ल्याचे संवर्धन करण्यासोबत किल्ल्यातील गैरधंद्यांना आळा घालण्याचीही मोहिम हाती घेतली आहे.सध्या वसई किल्ल्यातील सफाई, रखवालदार आणि इतर कामांसाठी पुरातत्व विभागाचे २६ कर्मचारी कार्यरत आहेत. या प्रत्येक कर्मचाºयांना दैनंदिन कामासोबत एक-एक पॉईंट देण्यात आला आहे. या पॉईंटवर देखरेख करून मद्यपी, अश्लिल चाळे करणारी प्रेमी युगुले यासह गैरधंदे करणाºयांना हुसकावून लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून त्यादृष्टीने कारवाई सुरु झाली आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे वसई उपविभाग अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.सध्या किल्ल्यात प्रि वेडींग फोटोग्राफीसह व्यावसायिक फोटोग्राफीला उधाण आले आहे. दररोज व्यावसायिक फोटोग्राफी केली जात असल्याने पर्यटकांना त्याचा त्रास होतो, त्याचबरोबर सरकारचा महसूलही बुडतो. पुरातत्व विभाग आपल्या हद्दीतील शुटींगसाठी दरदिवशी ५० हजार रुपये शुल्क आणि १० हजार रुपये अनामत रक्कम घेते. तर व्यावसायिक फोटोग्राफीसाठी प्रत्येक दिवशी १० हजार रुपये शुल्क आकारते. मात्र, स्टँड लावून फोटोग्राफी असेल तरच शुल्क आकारणी जात असून स्टँडशिवाय फोटोग्राफी केल्यास त्यास कोणतेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही. त्यामुळे वसई किल्ल्यात प्रि वेडींगच्या नावाखाली सुरु असलेल्या व्यावसायिक फोटोग्राफीला आवरणे अधिकाºयांना अशक्य होऊन बसले आहे.