शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक परिसरात ‘हाॅटस्पाॅट’ची भीती; नोकरीसाठी बाहेरून येतात कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:46 IST

नोकरीसाठी बाहेरून येतात कामगार : परराज्यांतूनही होते मालाची ने-आण

पंकज राऊतबोईसर : देशासह राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचे सावट सर्वत्र असून तारापूर एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी बाहेरून येणारे कामगार व अधिकारी तर  परराज्यातून मालाची ने-आण करण्यासाठी  मालवाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात होत असलेली वर्दळ पाहता  तारापूर औद्योगिक क्षेत्रात  कोरोनाचा हाॅटस्पाॅट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन  कोरोनाला वेळीच रोखणे प्रशासनापुढचे मोठे आव्हान असणार आहे. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे असे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग असून येथे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह  ठाणे, मुंबई, वसई-विरारपासून थेट गुजरात राज्यातून  नोकरीबरोबरच कामधंदा व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात लोक रोज ये-जा करीत असतात तर रोज शेकडो हलक्या, मध्यम व अवजड मालाची  वाहतूक करणारी  वाहने जात-येत असतात. अशा विविध ठिकाणांहून येणाऱ्यांपैकी कुणीही  व्यक्ती कोरोनाबाधित किंवा संक्रमित असला तर ते संक्रमण औद्योगिक क्षेत्रात पसरण्यास वेळ लागणार नसल्याने हा गंभीर धोका लक्षात घेऊन कठोर व पुरेशा उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

बाहेरून येणाऱ्या काही व्यक्ती व वाहनचालकांपासून कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या शक्यतेबरोबरच  तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात कुंभवली, कोलावडे, पाम, टेम्बी, सालवड, शिवाजीनगर, पास्थळ, सरावली, खैरेपाडा, बेटेगाव, अवधनगर, धनानीनगर, संजयनगर, धोडीपूजा, आझादनगर इत्यादी अनेक नागरी वसाहती आहेत.

सर्वात मोठी नागरी वसाहत ही बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रात असून  यापैकी काही अशा नागरी वसाहती आहेत, त्यामध्ये छोट्याशा रूममध्ये गोरगरीब असंघटित कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने राहत असल्याने आरोग्य विभागाने या भागाकडेही नजर ठेवून जनजागृतीबरोबरच नियमित चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट होत नाही तोपर्यंत ही तत्परता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, अधिकारी, कर्मचारी, कामगार व सर्व संबंधितांनी दाखवणे गरजेची असल्याचे मत व्यक्त होत आहे. कोरोनाचा संभाव्य  फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुरेसे  मनुष्यबळ व सोयी-सुविधा वाढवून  परिसरातील वसाहतीत तपासणी सुरू करून  लक्षणे दिसणाऱ्यांची त्वरित कोरोना टेस्ट करावी, अशीही मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :boisar-acबोईसरVasai Virarवसई विरार