शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नकोशा प्रकल्पांविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:24 IST

आदिवासींनी उगारले : स्वदेशी सरकारविरुद्ध महात्मा गांधीचे अस्त्र

पालघर : महात्मा गांधींनी स्वदेशीची घोषणा देऊन परकीय शक्तींविरुद्ध उपोषणास्त्र उगारले होते. मात्र स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटल्यानंतरही स्वदेशी सरकार विकासाच्या नावाखाली लादत असलेल्या विनाशकारी प्रकल्पांच्या निषेधार्थ ादिवासी एकता परिषदेने येथील तहसीलसमोर दिवसाचे उपोषण केले.

जिल्ह्यात विकासाच्या हव्यासापोटी इथले सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले असून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन,मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे,वाढवण बंदर,सागरी महामार्ग,एमएमआरडीए विकास आराखडा, एमआयडीसी या प्रकल्पांमुळे आदिवासी, मच्छीमार, शेतकरी, भूमिपुत्र विस्थापित केले जात आहेत. आदिवासींच्या अधिकारांची प्रशासना कडून पायमल्ली व पर्यावरणाचा ºहास केला जात आहे. महात्मा गांधींनी स्वदेशाची घोषणा देत भूमीपुत्रांचे स्वातंत्र्य, स्वावलंबन अबाधित ठेवण्यासाठी परकीयांविरोधात संघर्ष केला.पण दुर्दैवाने आता स्वकीयांविरोधातच संघर्ष करण्याची पाळी भूमिपुत्रांवर ओढवली आहे. शासन-प्रशासन जनताभिमुख होऊन जिल्ह्यावर लादलेले विनाशकारी प्रकल्प हटवत नाहीत तो पर्यंत हा संघर्ष गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या शिकवणुकीतून सुरू राहणार असल्याचे आदिवासी नेते काळूराम धोदडे यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी १० वाजता पालघरच्या हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून राजू पांढरा, दत्ता करबट, समीर वर्तक, डॉ.सुनील पºहाड, शशिकांत सोनावणे, दिलीप कोंब, शामु खडपडे, सुभाष तांडेल, अरु णा मानकर,दशरथ बामनिया, आदींनी तहसीलदार कार्यालयासमोरील मंडपात एकदिवसीय उपोषण केले.गांधी जयंतीनिमित्त कांदळवन स्वच्छता व संवर्धन अभियानच्बोर्डी : १५० व्या गांधी जयंतीनिमित्त मंगळवारी २ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चिखले-घोलवड या गावच्या सीमेवरील विजयवाडी समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनातील झाडांच्या फांद्यांना भरतीच्या लाटांनी गुंडाळलेले प्लास्टिक काढून स्वच्छता व संवर्धन अभियान केले गेले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.च्शासनाच्या स्वच्छता हीच सेवा या उपक्र माअंतर्गत भारतीय तटरक्षक दल, बोर्डी वन परिक्षेत्र, मेरिटाईम बोर्ड, घोलवड पोलीस, वाईल्डलाईफ कंन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन, समुद्रकाष्ठ मित्र मंडळ, श्री.माह्यावंशी आशिष ट्रस्ट आणि बोर्डीच्या एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाच्या एन.एस.एस. आणि एन.सी.सी.चे विद्यार्थी, चिखले-घोलवड ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेत कृतीशील सहभाग नोंदवला.च्या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिकांच्या मदतीने अखिल भारतीय मानवाधिकार नागरिक विकल्प डहाणू तलासरी समितीतर्फे करण्यात आले होते. यावेळी चिखले-मरवाडा येथील विजयवाडी समुद्रकिनाऱ्यालगत कंदळवनातील झाडांच्या फांद्यांना भरतीच्या लाटांनी गुंडाळलेले प्लास्टिक, पॉलिथिन व नायलॉनचे धागे कटरच्या साह्याने फांद्यांना ईजा न पोहचवता काढण्यात आले.बोईसर : पूर्वेकडील शांती रतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहून सर्वधर्म समभावाच्या जागृती करीता विद्यार्थ्यांनी विविध धर्माच्या वेशभूषा धारण करून वेगवेगळ्या तीन भागात प्रभात फेरी काढली. शाळेचे संस्थापक अमरचंद रान्देड, शाळेचे सचिव दिनेश रान्देड, पोलीस निरीक्षक जगताप, कार्यवाहक भाग्यश्री पाटील, मुख्याध्यापक जितेंद्र सिंह, शिक्षक , विद्यार्थी व इतर उपस्थित होते. अमरचंद रान्देड यांच्या प्रेरणादायी भाषणा नंतर विद्यर्ा्थ्यांनी लेझीमच्या तालासुरात कृष्णानगर, सरावली, बोईसर अशा तीन ठिकाणी प्रभातफेरी काढली. त्या मध्ये मदर टेरेसा, बाबा आमटे, गाडगेमहाराज, सावित्रीबाई फुले, कस्तुरबा गांधी, अशा अनेक समाजसेवकांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.वसई : वसईच्या ख्वाँजा गरीब नवाज सोशल मैत्रीच्या मुख्य कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती माणकिपुर कुंभारवाडा येथे मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जमील पटेल व सचिव फिरोज खान यांनी अनुक्र मे बापूजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी माता महिला मंडळाच्या अध्यक्षा शांती रावते व त्यांच्या सहकारी महिला यांनीही उपस्थितीची लावलीहोती.मोखाडा : ग्रुप फाऊंडेशनच्यावतीने २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी मोखाडा बसस्थानक ते साई मंदिर या शहरातील मुख्य रस्त्याची साफ सफाई करण्यात आली या उपक्रमात मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झालेहोते.

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार