शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्मचाऱ्यांनी वेळ न पाळल्याने शेतकरी माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:21 IST

पहिल्याच शिबिरात गलथान कारभार; किसान सन्मान निधी योजना उपक्रमात नियोजनाचा अभाव

डहाणू/बोर्डी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नवीन लाभार्थी शोधणे आणि पोर्टलला अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता करून डाटा दुरूस्त करण्यासाठी महसूल विभागातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पाचपैकी पहिल्या शिबिरासाठी नियुक्त अधिकाºयांच्या नियोजनशून्यतेमुळे दिरंगाई झाल्याने शेतकरी आणि कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.अस्मानी संकटांनी मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला सावरता यावे म्हणून शासन विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करीत आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांमार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत नवीन लाभार्थ्यांचा शोध घेण्यासह सद्यस्थितीतील डाटा, रद्द झालेला डाटा, बँक व्यवहारातील त्रुटी, लाभार्थ्यांचा थांबलेला निधी आदी त्रुटींची पूर्तता आणि माहिती अद्ययावत करून शेतकºयांना लाभ मिळावा म्हणून तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्याचा कार्यक्र म आखला आहे. डहाणू महसूल कार्यालयाअंतर्गत १८ नोव्हेंबर डहाणू मंडळ, १९ नोव्हेंबर कासा मंडळ, २० नोव्हेंबर सायवण मंडळ, २१ नोव्हेंबर आंबेसरी आणि २२ नोव्हेंबर रोजी चिंचणी येथे शिबीर होणार आहे.दरम्यान, सोमवारी डहाणू मंडळासाठी पहिले शिबिर मल्याण येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पर्यवेक्षण अधिकारी निवासी नायब तहसीलदार पी. डी. राठोड, डहाणू आणि मल्याण मंडळ अधिकारी अनुक्रमे गौरव बांगारा, आर. निमगुडकर यांच्या उपस्थतीत सकाळी अकरा वाजता सुरू होणार होते. मात्र हे अधिकारी साडेअकराची वेळ उलटूनही शिबीरस्थळी हजर नव्हते. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि शेतकºयांना ताटकळत बसावे लागले. हवालदिल झालेल्या बळीराजाला शासकीय अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटका सहन करावा लागला. रोजंदारी बुडवून शिबिराला आलेल्या शेतकºयांच्या भावनांची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.लाभ मिळणार तरी कसा?शिबिराला संबंधित मंडळात समाविष्ट असलेल्या ग्रा.पं.चे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, शेतकरी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी सहभाग नोंदवून जास्तीत जास्त लाभार्थी या योजनेत सहभागी होतील, याकरिता दक्षता घ्यायचे पत्रक तहसीलदारांनी काढले होते. मात्र बहुतेक कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी अनुपस्थित होते. योजना यशस्वी होऊन शेतकºयांना लाभ मिळणार कसा असा प्रश्न आहे.