शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आधारभूत भात खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:37 IST

‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे अवघे ३० टक्के पीक हाती उरले.

- हितेन नाईकपालघर : ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे अवघे ३० टक्के पीक हाती उरले. त्या उरलेल्या भातपिकाच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देत त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात उभारलेल्या आधारभूत भात खरेदी केंद्रांच्या २९ केंद्राकडे मात्र शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे उदासिन चित्र दिसून येत आहे.पालघर जिल्ह्यातील १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ५० हजार १७३ हेक्टर क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून नोंद करण्यात आली असून सुमारे १ लाख १४ हजार ९२ इतके शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मोठ्या महत्प्रयासाने शेतात उभे राहिलेले पीक डोळ्या समोरूनच निसर्गाच्या एका प्रकोपाने उद्ध्वस्त करून टाकल्याने जिल्ह्यातील शेतकरी राजा पार कोलमडून पडला आहे.या कोलमडून पडलेल्या शेतकºयाला पुन्हा पूर्वीच्याच ताकदीने उभारी देण्यासाठी शासन पातळीवरून भरघोस आर्थिक पाठिंबा देणे गरजेचे असताना शासनाकडून प्रति हेक्टरी ८ हजार तर कमीत कमी १ हजार रु पयांचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे. एवढ्या तुटपुंज्या मदतीची रक्कम जाहीर करून राज्यपालांनी शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटल्या जात आहेत.महाराष्ट्र शासनाकडून पालघर जिल्ह्याला एकूण ९ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी शेतक-यांच्या नुकसान भरपाईसाठी आला असून जिल्ह्यातील ८ तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातून त्याचे वाटप करण्यात येणार आहे.पालघर तहसीलदार कार्यालयाकडे १ कोटी ९७ लाख ५५ हजार ९८८ रु पयांचा निधी आला असून डहाणू १ कोटी ८६ लाख २९ हजार ४४८, तलासरी ८२ लाख ८२ हजार ९०५ रुपये, विक्रमगड १ कोटी १२ लाख १७ हजार ५३५, जव्हार ५० लाख ३ हजार १३६, मोखाडा ८१ लाख १८ हजार ६५, वाडा १ कोटी ९२ लाख ७४ हजार ३८, वसई ७० लाख १५ हजार ५६ इतका निधी शेतकºयांच्या नुकसान भरपाईच्या वाटपासाठी आला असून भरपाईच्या वाटपाची ७० टक्के रक्कम शेतकºयांना वाटप झाली असून येत्या दोन दिवसात नुकसानग्रस्त सर्व शेतकºयांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी लोकमतला दिली.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत जिल्ह्यात २९ आधारभूत खरेदी योजना केंद्रे २० नोव्हेंबरपासून उभारण्यात आली आहेत. जव्हार तालुक्यात २ खरेदी केंद्र विक्र मगड तालुक्यात ५, मोखाडा तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ८, डहाणू तालुक्यात ४, तलासरी तालुक्यात २, पालघर तालुक्यात २, वसई तालुक्यात २ अशी एकूण पालघर जिल्ह्यात २९ आधारभूत खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रात जिल्ह्यातील एकाही शेतकºयाने आपला तांदूळ विक्रीसाठी आणलेला नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ जव्हार यांनी कळविले आहे.तांदळाचे भावही गगनाला भिडणारया वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा फटका तांदूळ (भात) उत्पादक शेतकरी तसेच तांदूळ व्यापार करणाºया व्यावसायिकांना बसलेला पहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यातील ७५ हजार हेक्टर जमिनीवरती भात पीक घेतले जाते. मात्र झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी बाजारात विक्र ीस येणाºया भाताची आवक तब्बल ७० टक्क्यांनी घटली आहे. त्यातच विक्र ीस आलेला ३० टक्के तांदूळही निकृष्ट दर्जाचा असल्याची माहिती व्यापाºयांकडून देण्यात येते. सतत पडणारा पाऊस यामुळे तांदळाची प्रत खालावली गेली असल्याने तांदूळ खरेदी करण्यास येणाºया ग्राहकांकडूनही असमाधान व्यक्त करण्यात येते. त्यामुळे हाती उरलेला तांदळालाही किंमत मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्याला मिळणारा भरपाईचा मोबदलाही अत्यल्प असल्याने जगायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका तांदूळ उत्पादक शेतकरी तसेच तांदळाचा व्यापार करणाºया व्यावसायिकांनाही बसला असून येत्या काही दिवसात तांदळाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या दुहेरी संकटातून शेतकºयांना बाहेर काढण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला पेलावे लागणार आहे.शेतक-यांना हाती आलेल्या तांदळाला कमी दर मिळून त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यात २९ केंद्र उभारण्यात आली असून शेतक-यांनी त्याचा फायदा घ्यायला हवा त्यांच्या मालाची योग्य शहानिशा करूनच त्यांना केंद्रातून योग्य मोबदला देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे.- डॉ.कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार