शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

शेतकरी, बागायतदार, वीट उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 05:46 IST

यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला.

पारोळ : सोबा चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वसईतील भात, फळ, फूल, मासेमारी, मीठ, वीट या भूमिपुत्रांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले.यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वसई-विरार आणि ग्रामीण भागात पाऊस पडला. सोबा चक्रीवादळाचा मच्छीमारांनाही फटका बसल्याचे प्रामुख्याने दिसले आहे. चक्रीवादळामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमार बोटी समुद्र किनाऱ्याकडे परतल्या.जून महिन्यात कोरडाठाक राहिलेला मान्सून चिंतेची लाट घेऊन आला होता. मात्र जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासून मुसळधार बरसलेल्या पर्जन्याने शेवटपर्यंत वसई-विरारकरांना इंगा दाखवत अतोनात नुकसान केले. भातशेतीला तर चारवेळा पुराचा तडाखा बसला. मीठ उत्पादकांचेही या अतिवृष्टीने कंबरडे मोडले. बागायती शेतीला प्रामुख्याने या पावसाचा फटका बसला. तर पुराच्या तडाख्यामुळे घरादारात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सप्टेंबर महिन्यात साधारणपणे पाऊस परतीच्या मार्गाला लागतो. मात्र झाले उलटेच.ऐन सप्टेंबर महिन्यात भात आणि बागायती शेती फुलण्याच्या तयारीत असताना परतीच्या पावसाने मोठाच दणका दिला. यात शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले. महसूल प्रशासनाने सुमारे ३० हजार हेक्टरवरील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे. सुमारे ७५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड केलेली भातशेती यावेळच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बाधित झाली.पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असतानाच अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार वादळाने पुन्हा शेतीचा आर्थिक कणा मोडून काढला. या वादळाच्या तडाख्यातून शेतकरी राजा सावरत असतानाच आता अरबी समुद्रात पुन्हा उसळलेल्या सोबा चक्रीवादळाने शेतकºयांवर घाव घातला आहे. आधीच प्रचंड नुकसानाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकºयावर या वादळाने केलेला हल्ला शेतकºयांना नुकसानात टाकणारा ठरला आहे. यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आता अधिक खोलात बुडतो आहे.मनोर परिसरात पुन्हा रिमझिम; शेतकºयांची धावपळगुरुवारी सकाळी अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्याने खळ्यावरचा तसेच शेतात कापून ठेवलेला भात भिजू नये म्हणून मनोर परिसरातील आदिवासी तसेच इतर शेतकºयांची धावपळ उडाली.पाऊस थांबल्याने उरलासुरला भात कापून तो खळ्यापर्यंत आणला. मात्र, आज सकाळपासून मनोर, करलगाव, हलोली, कोसबाड अशा अनेक गावांत पुन्हा पावसाची रिमझिम झाली.भात भिजू नये यासाठी शेतकºयांनी उडव्यांवर प्लास्टिक टाकले. शेतातील पंचनामे झाले आता खळ्यातील पंचनामे करायची वेळ आली आहे. तसेच गंजावर नेलेले गवतही भिजल्याने व्यापाºयांचीही पंचायत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी