शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत भातखरेदी केंद सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी 

By नितीन पंडित | Updated: November 16, 2022 17:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी:दि.१६- राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुगाडफाटा ,झिडके ,पडघा येथील हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी:दि.१६- राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुगाडफाटा ,झिडके ,पडघा येथील हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी प्रगतिशील शेतकरी शिवाजी राऊत यांनी राज्य शासनाकडे केली आहे.विशेष म्हणजे शासन निर्देशाने हे भात खरेदी केंद्र मागील महिन्यातच सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले असतांनाही एक महिना उलटल्यानेही हे भट खरेदी केंद्र अजूनही सुरु करण्यात आले नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

        दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भातपीक चांगले आले आहे.त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातपीक हाती आल्याने हे भात सरकारी हमीभाव खरेदी केंद्रात विकण्यास येतात त्यामुळे भात विकून आपले कर्ज आणि पुढल्या वर्षासाठी कुटुंबाला सांभाळण्यासाठी पुंजी शेतकरी जमा करतो. मात्र दुगाड फाटा,पडघा व झिडके येथील भात खरेदी केंद्र अद्यापी सुरु झालेले नाही.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे राज्य सरकारने भात खरेदी केंद्र लवकर सुरु करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .          उधरनिर्वाहासाठी भात विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही मात्र त्यासाठी शासनाचे भिवंडी तालुक्यात हमीभाव भात खरेदी केंद्र अद्यापी सुरु झालेले नसल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना कमी पैशांमध्ये भात विकत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची खंत शेतकरी शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली आहे.राज्य शासन प्रति क्विंटल २०४० रुपये भाव देत आहे.मात्र बोनसचे ७०० रुपये शेतकऱ्यांना मिळत नसल्याने बोनसचे ७०० रुपये शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

          भिवंडी तालुक्यात २२ हजार हेक्टर शेतजमीनीवर भाताचे पीक घेण्यात आलेले आहे. २२७ महसुल गावांपैकी १६७ गावांमध्ये भाताचे उत्तम पिक घेतले जात आहे.भात पिकाचे उत्पन्न हाती आल्यावर त्यापैकी अर्ध्याअधिक धानाची विक्री करून शेतकरी सोसायटी किवा बँकाच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड करून आपल्या कुटूंबाचे गुजरान करीत असतो. त्यासाठी राज्य शासनाने तात्काळ दुगाड,झिडके आणि पडघा येथे भात खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.