शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 00:25 IST

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष दाखवून पालघर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवले.

नालासोपारा : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष दाखवून पालघर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवले. यामुळे कंपनीचे संस्थापक, संचालक, भागीदारांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याची चर्चा आहे.सांगली राज्यातील इस्लामपूर येथील रयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा.लि. कंपनी आणि त्यानंतर या कंपनीचे नामांतर करून त्याचे महारयत अ‍ॅग्रो इंडिया असे नाव झाले. या कंपनीत संस्थापक व अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते, भागीदार विजय शेंडे आणि इतर कंपनीचे भागीदार यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील अजित गंगाराम वझे यांच्याकडून ३ लाख ७५ हजार, वाणगाव येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्याकडून ५ लाख २५ हजार, अशा रकमा घेत आणि शेतकºयांचा विश्वास संपादन करून ३३ लाख ७५ हजार रुपये घेतले. पण कराराप्रमाणे कोणत्याही अटींचे पालन केले नाही.शेतकºयांचे पैसे परत देण्याचे वेळोवेळी खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अजित गंगाराम वझे यांनी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन कंपनी व संचालक, भागीदारांविरोधात तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.