शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हेलिकॉप्टर सर्व्हेमुळे शेतजमिनी अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:12 IST

आरिफ पटेल  मनोर : शासनाने केलेल्या हेलिकॉप्टर सर्व्हेनुसार पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकºयांची पारंपारिक शेती आरक्षित ठरविली गेल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. शासनाच्या प्रादेशिक योजने अंतर्गत काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरद्वारे सर्व्हे करण्यात आला होता. त्या आधारे ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील अनेक जमिनींवर आरक्षण तर काहींवर ग्रीन झोन दाखविण्यात ...

आरिफ पटेल  मनोर : शासनाने केलेल्या हेलिकॉप्टर सर्व्हेनुसार पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकºयांची पारंपारिक शेती आरक्षित ठरविली गेल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. शासनाच्या प्रादेशिक योजने अंतर्गत काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरद्वारे सर्व्हे करण्यात आला होता. त्या आधारे ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील अनेक जमिनींवर आरक्षण तर काहींवर ग्रीन झोन दाखविण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अनव्ये महाराष्ट्र शासन राजपत्र क्र मांक २६ दिनांक ५ एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रस्तावित जमीन वापर नकाशानुसार उप संचालक नगर रचना यांनी पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ज्या शेतकºयांच्या जमीनींवर आरक्षण दाखविले आहे. विशेष म्हणचे या पूर्वी या जमिनींवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नव्हते. दरम्यान, या चुकीच्या सर्व्हेची चौकशी करुन पुन:सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. विशेष म्हणजे या सर्व्हेतून मोठे विकासक व धनदांडग्यांच्या भूखंडांना वगळण्यात आले आहे. एकंदरीतच अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाºया राज्य शासनाने कागदी घोडे हालवून गोरगरिब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे.नगर रचनाकार म्हणतात, वरिष्ठांचा आदेशमोजे वाडा, ता. वाडा, जि. पालघर सर्व्हे क्रमांक ४०/११, ५७/२, ५७/३ तसेच उंबरखंड स. नं. ७७ ता. शाहपूर येथील शेतकऱ्यांना वन विभाकडून दाखला देण्यात आले आहे की त्यांच्या या जमिनीला वन कायदा लागू होत नाही. या जमिनी वन क्षेत्रात नसून सुद्धा ठाण्याच्या नगररचना, उपसंचालकांकडून या जमिनींवर फॉरेस्टचा शिक्का लागला आहे अशा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. हाच प्रकार पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत झाला आहे. अनेकांना ग्रीन व फॉरेस्ट झोन लागल्याचे नोटिसा देण्यात आल्या आहेत.वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रोसिजर सुरु आहे. तक्रारी असतील तर आम्ही काय करणार.- एस. डी. रणदिवे, नगररचना कार्यालय, ठाणे