शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वसईतही सापडली नकली अंडी?

By admin | Updated: April 13, 2017 02:41 IST

विरारमध्ये नकली अंडी असल्याची बाब उजेडात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वसईतील स्विटी डेव्हीड मिस्कीटा यांनीही नकली अंडी मिळाल्याची तक्रार केली आहे.

वसई : विरारमध्ये नकली अंडी असल्याची बाब उजेडात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वसईतील स्विटी डेव्हीड मिस्कीटा यांनीही नकली अंडी मिळाल्याची तक्रार केली आहे. स्विटी यांना बिग बाजारमधून नकली अंडी मिळाल्याचे उजेडात आले आहे. अंड्याचा नमुना अन्न व प्रशासन विभागाकडे पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत खुलासा होणार आहे. आहारात महत्वाचे घटक असलेले अंडे आता आरोग्याशी खेळणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाजारपेठेत चिनची प्लॅस्टिकची नकली अंडी विकली जात आहेत. मंगळवारी विरारमध्ये मंदार मिंगेल यांनी नकली अंडी मिळाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी वसईतील कतारेवाडी येथील स्विटी डेव्हीड मिस्कीटा यांनी बिग बाजारातून खरेदी केलेली अंडी बनावट असल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी) आगीजवळ नेताच कवच पेटले : अंडे फोडत असताना त्याच्या दर्जाविषयी स्विटी यांना शंका आली. अंडी फुटत नव्हती. अंड्यांना आगीजवळ नेले असता कवचाने पेट घेतला. कवच जळत असताना प्लास्टिक जाळल्यासारखा वास येत होता. अंडे उकडले असता रबरासारखे चिवट व खेचले जाऊ लागले. त्यामुळे स्विटी मिस्कीटा यांनी ताबडतोब वसई विरार महापालिकेच्या वसई विभागीय कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. अंडे खराब असेल तर त्यातून दुर्गंधी येते. मात्र मी खरेदी केलेल्या अंड्याचा पिवळा बलक निघण्याऐवजी त्यातून पातळ पदार्थ बाहेर आला. कवच जळताना त्यातून प्लास्टिकचा वास येत होता, असा स्विटी यांचा आरोप आहे. अंड्याचा नमुना अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच वसईतील बिग बाजारचे वरिष्ठ अधिकारी राहूल भांडारकर यांना याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती प्रभाग समितीचे सभापती प्रवीण शेट्टी यांनी दिली.