शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जाळ्यातील व्हेलची सुखरूप मुक्तता; मच्छीमारदिनीच घडला महाथरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:38 IST

वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले.

पालघर : वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले. आपले जाळे फाडून व नुकसान सहन करून मच्छीमारांनी त्याची सुटका केली व आपला जागतिक मच्छिमार दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.तालुक्यातील वडराई हे ताज्या बोंबीलांसाठी प्रसिद्ध असून मंगळवारी हितेंद्र मेहेर हे बोट घेऊन पहाटे ४ वाजता मासेमारीला गेले होते. समुद्रात १२ नॉटिकल मैल क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील डोल जाळी कवी च्या खुंटाना रोवली. काही वेळा नंतर हे डोल जाळे खेचत असतांना त्यांना सुमारे २५ ते ३० फुटांचा शार्क व्हेल मासा जाळ्यात अडकून सुटके साठी धडपडत असल्याचे दिसले. बोटीतील सर्व मच्छिमारांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. बोटीत असलेल्या घोशाच्या (काठीला बांधलेले टोकदार आयुध) सहाय्याने त्याच्या शरीरा भोवती लपेटलेले जाळे त्याला कुठलीही इजा न करता तोडून टाकण्यात यश मिळवले. आणि तो पाण्यात दिसेनासा झाला.अत्यंत खतरनाक म्हणून ओळखला जाणारा हा मासा मोठा असून शांत असतो. करंदी, मांदेली आदी लहान लहान मासे खाऊन जगतो. शार्क प्रमाणे तो अजिबात हल्ला करीत नाही. समुद्री पर्यावरण राखण्यात ह्या माशाचा मोठा वाटा असून ह्या माशाने आपल्या शरीरातून टाकलेल्या महाकाय विष्ठेच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होत असल्याचे झुआॅलॉजीचे प्राध्यापक भूषण भोईर यांनी लोकमतला सांगितले. या प्लवंगा शेजारीच मासे आपली अंडी घालीत असल्याने माशाच्या पिलांचे संवर्धन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.सातपाटी, डहाणू गावासमोरील समुद्रात मोठ्या प्रमाणात व्हेल, शार्क, डॉल्फिन, आदी माशांचे वास्तव्य असून वाढवणं बंदर, कॉरिडॉर मुळे ह्या माशाचा अधिवासच नष्ट होणार आहे. -प्रा.भूषण भोईर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार