शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या सुयोग नगरमधील 'गॅलक्सी अपार्टमेंट'मध्ये मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 14:36 IST

कोविड संक्रमण व ऑक्सिजनची कमतरता असतानाही सुरू आहे वृक्षतोड ; पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

ठळक मुद्देनवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग स्थित चुळणे  रोड या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या  गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल मागील दोन दिवसांपासून सुरू आहे

आशिष राणे

वसई - वसई विरार शहर महापालिका "एच" प्रभाग समिती अंतर्गत नवघर माणिकपूर शहरातील सुयोग नगर स्थित गॅलक्सी अपार्टमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी मागील दोन दिवसापासून  मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल सुरू असल्याची माहिती वृक्षप्रेमी नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरा लोकमतला दिली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभाग स्थित चुळणे  रोड या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या  गॅलक्सी अपार्टमेंट मध्ये मोठ्याला झाडांची बेसुमार कत्तल मागील दोन दिवसांपासून  सुरू असून देखील महापालिका व पोलीस प्रशासन  यांचे भरारी पथक काय पेट्रोलिंग करत होते असा प्रश्न आता वृक्षप्रेमीं नागरिकांना पडला आहे. सर्वत्र लॉकडाऊन व कोरोनाचे संक्रमण आणि विशेष म्हणजे सर्वत्र प्राणवायू (ऑक्सिजन) ची कमतरता असताना गॅलेक्सी सोसायटीला अचानक अडसर ठरणाऱ्या या मोठ्याला व जुन्या झाडांची  मुळासकट कत्तल केल्याची गंभीर घटना शनिवारी रात्री जागरूक वृक्षप्रेमीं नागरिकामुळे उघडकीस आली आहे.

गतवर्षी पासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे त्यात यंदा देशभर कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवत असताना एकीकडे दररोज शेकडो रुग्ण दगावत आहेत आणि इथे पर्यावरण संरक्षण व त्यास चालना म्हणून सरकार झाडे लावायला सांगत आहे आणि हा उपक्रम करण्याचे सोडून सोसायटीच्या वतीनं ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचीच खुलेआम  कत्तल केली जाते आहे हे महाभयंकर व हा मनुष्यवधच आहे

दरम्यान, सर्वत्र लॉकडाऊन व शनिवार -रविवार सुटटीचा फायदा घेत वसईत बेकायदेशीर बांधकाम व वृक्षतोड सर्रास सुरू आहे याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी लोकमत शी बोलताना दिली. या वृक्षतोडीची माहिती जागरूक नागरिकांनी लोकमत माध्यमाला देताच एच प्रभाग समितीचे सहा. आयुक्त मनाली शिंदे यांना विचारले असता त्यांनी या वृक्षतोड कत्तल प्रकरणी आता रात्र झाली आहे, दिवसा सांगायला हवं होत अशी नकारात्मक प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिली 

परिणामी या वृक्षतोड प्रकरणी संबधीत उपायुक्त तानाजी नरळे यांना सांगितले असता त्यांनी आपण वृक्ष प्राधिकरण उपायुक्त यांच्याशी बोला असे सांगितले. यावरून महापालिका प्रशासन किती गंभीर आहे हेच या उपरोधक प्रतिक्रियेवरून दिसून येते. त्यामुळे, पालिकेचे रखवालदारच शेतातील कुंपण खातात असे स्पष्ट दिसून येते.

या प्रकरणी आता एच प्रभाग समितीने गॅलेक्सी अपार्टमेंट ने वृक्ष प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतली आहे का नाही याची योग्य ती चौकशी करून वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीरता दाखवून या घटनेस जबाबदार असणाऱ्या रहिवाशी संकुल व त्यातील पदाधिकाऱ्यावर वृक्षतोड प्रकरणी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी वृक्ष प्रेमींकडून होत आहे.

झाड तोडणं हा कायदेशीर गुन्हा आहे तसं जर असेल तर फार गंभीर आहे,बाहेर परिस्थिती काय चालली आहे ,पालिका प्रशासन कोविड मध्ये व्यस्त असताना आता यांच्या मागे जायचे का ?मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो व उद्यान अधीक्षक मयूर साळवे यांना पाहणी करायला सांगितले आहे. -------------------------------------सतीश लोखंडे (भा प्र से)प्रभारी आयुक्त, वसई विरार महापालिकाआपण मला घटना व त्याचे फोटो पाठवा तसेच या रहिवासी संकुलासाठी वृक्षतोड प्रकरणी प्राधिकरण ने  काही परवानगी दिली आहे का नाही हे तपासावे लागेल मी पहातेचारुशीला पंडितवृक्ष प्राधिकरण अधिकारी मुख्यालय---------------------------------रात्रीच्या वेळी झाडे तोडणे हे कायदेशीर रित्या चुकीचे आहे त्यांच्या जवळ परवानगी आहे का नाहीं यासाठी घटनास्थळी पोलीस टीम पाठवतो व माहिती घेतोभाऊसाहेब आहेरपोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस स्टेशनझोन-2

टॅग्स :Vasai Virarवसई विरार