शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

खड्डेमय रस्त्यांत चांद्रसफरीची अनुभूती, मनसेचे ‘अंतराळवीर’ उतरले रस्त्यावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 02:29 IST

चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

पारोळ : वसई-विरारमधील हातभर खड्ड्यांमुळे वाहन चालक, नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे जनतेत आक्रोश असताना मनसेने वसई-विरार महापालिकेला इशारा दिला होता. मात्र महापालिकेने त्याकडे कानाडोळा केल्याने अखेर सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पीपीई कीट आणि पांढरे हेलमेट घालून अंतराळवीर बनून भिवंडी-कामण रोडवरील खड्ड्यांवर चालून प्रत्यक्ष चंद्रावर पोहोचल्याचा प्रतिकात्मक अनुभव घेतला.चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांत पडलेले खड्डे इतके धोकादायक बनलेत की वेळीच हे खड्डे बुजवले गेले नाहीत, तर एखाद्याचा त्यात जीव जाण्याचा धोका आहे. वसई महापालिका परिसरातील कामण-चिंचोटी-भिवंडी रोड, गोखिवरे ते पुढे वसईफाटा येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्त्यांतून वाहने चालवताना वाहनांचे स्पेअर पार्ट भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे खराब होत असल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना मोठे खड्डे चटकन लक्षात येत नसल्याने वाहने खड्ड्यांत आपटून त्यांचे नुकसान होत आहे. बऱ्याच वाहन चालकांना त्यामुळे इजाही झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने याविरोधात महापालिकेला खड्ड्यातच झाडे लावण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही महापालिकेने त्याकडे कानाडोळा केल्याने अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कामण-भिवंडी रोडवरील खड्ड्यांमधून अंतराळवीराचा गणवेश घालून चंद्रावर पोहोचल्याचा प्रतीकात्मक टोला महापालिका प्रशासनाला लगावला आहे.

टॅग्स :Potholeखड्डेroad transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरार