शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वाढवणवरील खर्च हा उधळपट्टी - न्या. धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:08 IST

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकजुटीने विरोध केलेल्या व पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने हद्दपार केलेल्या वाढवण बंदराबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता शासन व जेएनपीटीने बंदराचा सुरू केलेला सर्व्हे आणि इतर कामे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचे परखड मत प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांनी मुंबई येथे झालेल्या सुनावणी ...

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकजुटीने विरोध केलेल्या व पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने हद्दपार केलेल्या वाढवण बंदराबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता शासन व जेएनपीटीने बंदराचा सुरू केलेला सर्व्हे आणि इतर कामे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचे परखड मत प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांनी मुंबई येथे झालेल्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले.सन १९९८ मध्ये वाढवण येथे पी अँड ओ या आॅस्ट्रेलियन कंपनीला २९ धक्क्याचे बंदर वाढवण येथे उभारण्यास दिलेली अनुमती येथील मच्छीमार, बागायतदार, डायमेकर, आदिवासी, दलित यांनी निर्णायक लढा देऊन हाणून पाडली. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या आदेशामुळे ते शासनाला रद्द करावे लागले होते. या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन करीत लाखो स्थानिकांना दिलासा मिळाला होता.मात्र तेच सरकार व सत्ताधारी पुन्हा सत्तेवर आल्यावर १८ वर्षांनंतर वाढवण बंदराचे भूत जबरदस्तीने स्थानिकांच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अणुऊर्जा प्रकल्पासाठी आपल्या घरादारावर नांगर फिरवून जमिनी देणाºया पोफरणवासीयांचे काय हाल झालेत हे पाहिल्यानंतर स्थानिकांचा सरकार व लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडून गेला आहे.लोकांचा विरोध असतांनाही वाढवण बंदर जबरदस्तीने शासन लादू पाहत असल्याने या महाकाय वाढवण बंदराविरोधात वाढवण बंदर संघर्ष समितीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे.तिची सुनावणी गुरुवारी मुंबई येथे झाली. त्याला सरकारच्या आणि जे. एन.पी.टीच्या वतीने वरिष्ठ अधिकारी आणि संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी हजर होते. वाढवण बंदर स्थगीतीचा निर्णय या पूर्वीच झालेला असतांना डहाणूच्या प्रादेशिक विकास आराखड्यात वाढवण बंदराच्या समावेशाला सर्वोच्च न्यायालय परवानगी देईल, असे आधीच गृहीत धरुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंदराच्या सर्वेक्षणाचे, मोजमापाचे, काम सुरु करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे, अशा शब्दात डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकारणाचे अध्यक्ष न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यानी जे. एन.पी.टी व्यवस्थापन आणि सरकारला सुनावले.ज्या वाढवण व परिसरातील पर्यावरणीय परिस्थिती, मत्स्य संवर्धन, सागरी जीवांच्या निर्मितीस पोषक वातावरण आणि कायद्याच्या आधारे पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील भागाचा अभ्यास करण्यात आल्यानंतर वाढवण बंदराला स्थगिती देण्यात आली होती. तिच परिस्थिती व तेच कायदे आजही कायम असल्याने १८ वर्षांपूर्वी दिलेली स्थगिती आजही कायम आहे, असेही न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सांगून बंदर परिसरात सर्व्हे किंवा इतर कोणतेही काम करता येणार नाही असे निर्देश संबंधितांना दिले.तसेच बंदर समुद्रात उभारणार असल्याचा दावा सरकार करीत असले, तरी त्याचे परिणाम सभोवतालच्या जमिनीवर आणि परिसरात बागायती क्षेत्रावर पर्यावरणावरही होणार असल्याची जाणीवही न्यायाधीशांनी करून दिली. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार, डायमेकर्स, बागायतदार यांना मोठा दिलासा मिळाला असून या बंदराला विरोध करण्याची ताकद वाढली असल्याचे अनेकांनी सांगून प्राधिकरणाच्या कारवाईबाबत समाधनही व्यक्त केले.बंदराचा आराखडा प्राधिकरणाला दिला नाहीडहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच येथील पर्यावरणाचे रक्षण करीत आहे. जे.एन.पी.टी व्यवस्थापनाला प्रस्तावित वाढवण बंदराचा विकास आराखडा प्राधिकरणाकडे देण्यास सांगण्यात आले असतांनाही त्यांनी तो अद्यापि दिला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत सरकार अथवा जेएनपीटीच्या वकीलांनी कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही.