शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

विरार वगळता वसईत शेकडो मेडिकल्स बंद, आॅनलाइन विक्रीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:09 IST

ई-पोर्टलची सक्ती सोबत आॅनलाइन औषध विक्र ीच्या विरोधात केमिस्ट असोसिएशन आॅफ वसई तालुकाने पुकारलेल्या मेडिकल बंदला विरार वगळता वसई रोड, नवघर माणिकपूर शहर व नायगावसहित वसई गावच्या पूर्व-पश्चिम भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वसई : ई-पोर्टलची सक्ती सोबत आॅनलाइन औषध विक्र ीच्या विरोधात केमिस्ट असोसिएशन आॅफ वसई तालुकाने पुकारलेल्या मेडिकल बंदला विरार वगळता वसई रोड, नवघर माणिकपूर शहर व नायगावसहित वसई गावच्या पूर्व-पश्चिम भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजता शेकडो औषध विक्रेत्यांनी नवघर एस टी डेपो पासून वसई तहसीलदार कार्यालय आणि तेथून पुन्हा होळी, देवतलावमार्गे वसई पूर्व पट्टीत भव्य मोटार रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.केमिस्ट संघटनेच्यावतीने बाळा चौधरी , धर्मेश चौधरी राजू मिश्रा तसेच विजय वोरा आदींनी ही मोटार रॅली काढण्याआधी हा मेडिकल बंद नेमका कशामुळे करतो आहे, हे त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांना पटवून दिले. आॅनलाईन पद्धती हि आम्हा विकेत्यांना कशी घातक आहे, हे सांगून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले, एकूणच औषधविक्रेत्यांना मारक ठरणारी धोरणे राबविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असून त्यास विरोध दर्शविण्यासाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मागील आठवड्यात देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्य तसेच पालघर जिल्हा आणि वसई तालुका केमिस्ट असोसिएशनशी संलग्न शहरातील सुमारे पाचशेहून अधिक आणि जिल्ह्यातील दोन ते अडीच हजाराहून अधिक औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेऊन सरकारचे लक्ष वेधले.यावेळी वसईतील बहुतांशी दुकाने तसेच होलसेलर्स यांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती त्यामुळे सकाळपासूनच वसईत सर्वत्र शुकशुकाट होता. ग्राहकांचे मात्र यामुळे हाल झाले.मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्दमेडिकल बंद संदर्भात मागण्यांच्या निवेदनाची प्रत संघटनेकडून पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांना देण्यात आली असून विक्र ेत्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती प्रशासनाला करण्यात आल्याची माहिती केमिस्ट असोसिएशन आॅफ वसई तालुका संघटनेचे अध्यक्ष महेश उर्फ बाळा चौधरी यांनी लोकमत ला दिली.संघटनेची अशीही मदतबंद काळात या बंदला अपवाद म्हणून कुठलाही रु ग्ण दगावू नये अथवा कुणालाही औषधांची गरज भासल्यास वसईत अनेक ठिकाणी रु ग्णालयाशी संलग्न असणारी मेडिकल दुकाने व ठिकठिकाणी केंद्र निर्माण केली होती. त्यामुळे अशा गरजूंची फार गैरसोय झाली नसल्याचे समजते.विरारमध्ये मेडिकल सुरू होती !....या बंद मध्ये विरार ची एकमेव संघटना मात्र सहभागी न झाल्याने विरार विभागातील जवळपास शंभरहून अधिक दुकाने उघडी ठेवण्यात आली होती, परंतु आॅनलाइनच्या जाचातून आमची सुटका करा आणि स्वत: अन्न व औषध प्रशासन सुद्धा या सरकारच्या आॅनलाइन कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगून केमिस्ट तालुका संघटनेने दुकाने बंद ठेवलीकिरकोळ औषधविक्र ी ठप्पऔषध विक्र ेत्यांच्या संपाबाबत अनेक नागरिकांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे रु ग्णासाठी औषधे खरेदीकरीता बाहेर पडणाºया नागरिकांचा थोडाफार गोंधळ उडाला.तर दुकाने बंद का आहेत, असा प्रश्न काहींना पडला. त्यापैकी अनेकांना औषधे मिळविण्यासाठी हॉस्पिटल गाठावे लागले.विरार वगळता बहुतांशी औषध विक्र ेते या बंदमध्ये सहभागी झाले. मात्र, रु ग्णांची हेळसांड होणार नाही याची तितकीच काळजीही आम्ही घेतली. आमच्या भावना आम्ही जिल्हाधिकाºयाांमार्फत सरकारपर्यंत पोहचिवल्या. - महेश चौधरी , अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन वसई तालुका.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या