शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार परिसरातील पर्यावरण संरक्षित क्षेत्र धोक्यात, भूमाफियांनी बळकावले भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:16 IST

Vasai-Virar News : वसईत भूमाफियांनी उच्छाद मांडला असून शहरातील आरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या संरक्षित भूखंड बळकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पर्यावरणाचीही हानी हाेत आहे.

- प्रतीक ठाकूर विरार - वसईत भूमाफियांनी उच्छाद मांडला असून शहरातील आरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या संरक्षित भूखंड बळकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पर्यावरणाचीही हानी हाेत आहे. या क्षेत्रात बेकायदा बांधकामांचा फास घट्ट आवळला जात असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.वसईतील पर्यावरण समतोल राखण्यासाठी शासनाने वसईतील २८ गावे ही पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. त्यानुसार या गावांत आणि गावालगत एक किलोमीटरच्या आसपास बांधकामांना परवानगी नाकारली होती. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एप्रिल २०१९ रोजी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयुक्तांना सर्वेक्षण करून या परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, पालिकेने या आदेशांचे पालन केलेले नाही. उलट या भागात वर्षभरात बेकायदा बांधकामे आणखीन फाेफावल्याचे दिसत आहे. शासनाने वसई-विरार परिसरातील २८ गावे ही पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यात तुंगारेश्वर, पारोळ, कणेर, पोमण, सिरसाड, पेल्हार, वालीव, कामण, कोल्ही, देवदल, चिंचोटी, चंद्रपाडा, टिवरी, राजिवली, सातिवली, खैरपाडा, कनेर, मांडवी आदी गावांचा समावेश आहे. मात्र, काही महिन्यांत या गावांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यासाठी तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. नैसर्गिक नाले, तलाव, डोंगर, खाडी बुजवून ही बांधकामे उभी राहिली आहेत. येथील कारखान्यांतील रसायनयुक्त पाण्यामुळे नैसर्गिक जलस्राेत दूषित हाेत आहेत. प्रभाग एफ आणि जी मधील उमर कम्पाउंड, जाबरपाडा, वनोटापाडा, रिचर्ड कम्पाउंड, खैरपाडा, तुंगारेश्वर, चिंचोटी, कामण, भोयदापाडा, राजिवली, राजप्रभा, धुमालनगर या परिसरात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. 

बेकायदा बांधकामांचा विषय महापालिकेने गांभीर्याने घेतला आहे. प्रभाग समिती सहायक आयुक्तांना यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षित क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जाईल.- आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार