शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

झडपोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जानेवारीअखेर ६ शिक्षक भरणार

By admin | Updated: December 22, 2016 05:32 IST

: झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील सहा प्राध्यापकांची पदे जानेवारी अखेरपूर्वी भरली जातील असे लेखी आश्वासन

विक्रमगड : झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील सहा प्राध्यापकांची पदे जानेवारी अखेरपूर्वी भरली जातील असे लेखी आश्वासन तंत्रशिक्षण सहसंचालकांनी दिल्यामुळे बुधवारी या मागणीसाठी येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात सापडलेले असून त्यामुळे येथे वेगवेगळया प्रकारचे व्यवसायिक शिक्षण घेणा-या ७५० विदयार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून एकूण ४८ कर्मचारी व अधिकारीवर्गाची आवश्यकता असतांना फक्त १६ कर्मचारी कार्यरत आहेत़ येथील विदयार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून सामजिक कार्यकर्ते निलेश सांबरेंसह सरपंच सोनीबाई जाधव, प्रदिप भोईर,आकाश चौधरी, उपसरपंच विजय पाटील, अशोक भोरे आदींसह तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसले होते़याची दखल घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सह संचालक प्रमोद नाईक यांनी धाव घेतली व उपोषणकर्त्यांंशी केलेल्या चर्चेअंती जानेवारीपर्यंत ६ प्राध्यापक नियुक्त केले जातील असे लेखी आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई येथे प्रतिनियुक्ती असलेले विद्युत शाखेचे अधिव्याख्याता खडसे यांची प्रतीनियुक्ती रद्द करण्यात येऊन त्यांना तत्काळ या तंत्रनिकेतनमध्ये रुजू होण्याबाबत कळविण्यात आले आहे़ तसेच पाच विद्या शाखेच्या प्राध्यापकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनास प्राधान्याने सादर करुन जानेवारी २०१७ अखेरपर्यत त्यांची नियुक्ती केली जाईल, असेही म्हटले आहे. दरम्यान उर्वरीत रिक्त पदांवर अध्यापकाच्या मे/जून २०१७ मधील नियतकालिन बदल्यांमध्ये बदल्या प्रस्तावित करुन ही पदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यांत येईल व त्याबाबतचा आवश्यक पाठपुरावा संचालनालयामार्फत करण्यांत येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर निलेश सांबरेसहीत सर्वांनी उपोषण सोडले. यावेळी तहसिलदार सुरेश सोनवणे म्हणाले की, माझ्या येथील अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी प्रथमच असे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याकरीता झालेले उपोषण पहातो आहे़ उपोषणाला कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळकृष्ण पुर्णेकर, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, कॉग्रेसचे नितीन वाडेकर आदींनी पाठिंबा दिला व उपोषण सोडतेवेळी ते े व्यासपिठावरही उपस्थित होते़