शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

मोहाच्या फळांमुळे आदिवासींना रोजगार

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील मोहाचे वृक्ष त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत़ याकाळात मोहाच्या वृक्षांना फुले बहरली आहेत़ ही फुले पहाटच्या सुमारास मोठयासंख्येने झाडाखाली पडलेली असल्याने ती वेचण्याचे काम होत असून त्यापासून मुख्यत: दारु होत असल्याने तसेच औषधी म्हणून तिचा उपयोग सर्वश्रुत असल्याने ती नगदी कमाई ठरत आहे.मोहाचे झाड म्हणजे शेतकरी मजुंराची पडती बाजुच समजली जाते़ ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ मोहाच्या झाडापासून शेतकऱ्याला स्वत:चे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्याकरीता लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या तिव्र उष्णतेने सुकून जातात़ परिणामी वाऱ्यामुळे जमीनीवर पाला-पाचोळा तयार होतो़ व तो या दिवसांत शेतीची राबनी करण्याकरीता वापरला जातो़मोहाच्या झाडांच्या वाढत्या उपयोगामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते तर महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकलो ७० तेक ८० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते़ तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो़ यामुळे मोहाचे झाड आदिवासी गोरगरिब शेतकरी, मजुरांसाठी जणू फलदायीच बनले आहे़या झाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता फळास लागली की, ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने या फुलांस भाव मिळाला तर २० ते ३५ रुपये किलोने विकून गावठी दारु बनविली जाते़ तसेच तिचा औषध म्हणून वापर होत असतो.फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडें (मोहटया) म्हणुन संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहटया तयार केल्या जातात़ त्या सकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो़ तर पिकलेल्या दोंडयामधून पाच ते सहा बिया मिळतात़आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो़ त्यानंतर त्या बिया फोडल्या असता यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ही दले सुकवितात़ दरम्यानच्या मोसमात एक व्यक्ती प्रतिकुंटुंब एक क्विंटलच्या आसपास ही दले तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़फळ एक फायदे अनेकसुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ तर कडूपणा काढण्यासाठी त्या तेलात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मैला व कडूपणा नष्ट होवुन तेल खाण्यास योग्य होते. रुग्ण चिकित्सा करतांना या कच्चा तेलाचा उपयोग होत असून थंडी ताप आल्यास कपाळावर रुमाल भिजवून ठेवला असाता आरोम मिळतो अशी मान्यता आहे. शिवाय, यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते़ फळ फोडल्यानंतरही टरफले शेतात टाकली जातात़ पाऊस पडल्यानंतर ही टरफले जमीनीत कुजली जातात़ त्यातून खतनिर्मीती होऊन पिकेही भरभरुन येत असतात़