शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बनले भाजपाचे कार्यकर्ते, नीलम गो-हे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:35 IST

भाजपकडे कार्यकर्त्यांच्या फळीची कमतरता असल्याने तिने आपल्या प्रचारासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यकर्ते बनविले असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे आणि अनिल परब ह्यांनी पत्रकार परिषदेत करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पालघर  - भाजपकडे कार्यकर्त्यांच्या फळीची कमतरता असल्याने तिने आपल्या प्रचारासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यकर्ते बनविले असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे आणि अनिल परब ह्यांनी पत्रकार परिषदेत करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांच्या साम, दाम, दंड, भेद आणि अरे ला कारे असे उत्तर द्या. अशी वक्तव्य केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असताना मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनबाबत केलेल्या गंभीर वक्तव्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने पालघर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.शुक्र वारी पालघर येथे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्याच्या भाषणाची क्लिप वाजून दाखिवण्यात आली.त्या क्लिप मधील आवाज हा माझाच असल्याचे त्यांनी मान्य केले.मात्र शिवसेनेकडून त्यात काही बदल करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केल्या नंतर सेनेने हे बदल केलेत हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे असे आव्हान सेनेच्या आ.गो-हे  ह्यांनी दिले.साम, दाम, दंड भेद म्हणजे कुटनीती असे म्हणणाºया मुख्यमंत्र्यांनी डहाणू मध्ये झालेल्या पैसे वाटप करून दाम ह्या शब्दाचा अर्थ दाखवून दिल्याचे आ.परब ह्यांनी सांगितले. वनगा कुटुंबीयांनी दिवंगत चिंतामण वनगा चा फोटो वापरीत असल्या बाबत निवडणूक आयोगा कडे तक्र ार करूनही निवडणूक संपत आला तरी भूमिका स्पष्ट होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.आमच्या बोईसर मधील शिवसैनिकावर खंडणीचे गुन्हे दाखल प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांच्यावर तात्काळ तडीपारीच्या नोटीसही बजावण्याची तत्परता मुख्यमंत्र्यांनी इतर बाबतीत ही दाखवायला हवी होती असे आ.गोº्हे ह्यांनी सांगितले.ह्या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी ह्यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018