शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

विटभट्टीतून ‘त्यांना’ मिळतोय रोजगार, गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी मिळते उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:45 IST

विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत.

तलवाडा : विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत. यांलाच आदिवाासी मजुर भोंगा असेही संबोधतात़ दिवसा विटा बनवून रात्री ते निवारा याच भोंग्यामध्ये करतात.ठाणे जिल्हा व मुंबई उनगरात दररोज उभ्या राहाणाºया टोलेजंग इमारती व कारखान्यासाठी लाखो विटांची गरज लागते. विक्रमगड तालुक्यातील या भट्टयांवर तयार झालेल्या विटा मोठया प्रमाणात इतर शहरात जात असतात. या विटा बनविण्यासाठी शेकडो मजूर वीटभट्टीच्या ठिकाणी दाखल होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर हा वीट बनविण्याचा कारखाना बंद होतो. ़त्यानंतर तो व्यवसाय दिवाळीनंतर सुरु होतो़ दरम्यान गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी लागणाºया खर्चासाठी वीटभटटी मालकांकडून हे कामगार, मजुर आगावू रक्कम उचल म्हणून घेऊन आपली उपजिवीका चालवितात. दिवाळी सरताच ते पुन्हा नव्या जोमाने कुटुंबासह वीटभट्टी मालकांकडे कामासाठी येत असतात़विक्रमगड तालुक्यातील सवादे, मलवाडा, पोचाडे, आंबेघर, आलोंडे, ओंदे, गडदे अशा विविध गावामध्ये विटा बनविण्याचे काम जोमात सुरु झाले आहे़ त्यामुळे वीटभटटी मालक काम करणाºया मजुरांना अधिक रक्कम खर्चासाठी देऊन बुक करुन ठेवत असतो़दरम्यान, कुणी वीटभट्टी मजुर कामगांराना जादा मजुरी देऊन पळवू नये यासाठी मालक स्वत:गाडी, ट्क, टेम्पो पाठवून मजुरांना घेऊन येतात़ अशी धावपळ असते.सवलतींचा भार वाढणारबहुसंख्य मजुर हे विक्रमगड व तालुक्याच्या बाजुंच्या गावातील व अन्य जवळच्या तालुक्यांतील आदिवासी भागात राहाणारे आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांची वीटभट्टी मजुर कामगारांमध्ये संख्या जास्त आहे. पती, पत्नी,भाऊ असे कामगार एकत्रपणे वीटभटटीवर काम करत असतात़कामासाठी आलेले हे कामगार थंडी व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून वीटभट्टीजवळ असलेल्या मोकळया जागेचे मैदानात स्वत:बांबु लाऊन आपली झोपडी-घर उभे करुन आठ महिने तेथे राहत असतात़. ते मजुर हे दिवसाला सर्वसाधारणपणे १५०० ते २००० हजार विटा तयार करतात. कच्चा मातीने तयार केलेल्या विटा या लाखोंच्या संख्येने तयार करुन त्या भट्टीवर लाऊन लाल होईपर्यत तयार करुन विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जात असतात़ याकरीता २० ते ३० दिवसांचा अवधी लगत असतो. मेहनतीच्या मानाने त्यांना येथे पुरेशा सुविधा नसतात हे वास्तव आहे.मजुरांना जेवण -पाण्याची सोय मालक वर्ग योग्यरित्या करीत असल्याने ते आनंदाने त्यांच्याकडे आठ महिने राहतात़ यातुन मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला आहे़ पावसाळयात हे मजुर पुन्हा आपल्या घरी परतुन चार महिने शेतीवाडी करीतात. सणाच्या काळात ते हमखास आपल्या गावी परततात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार