शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेजिंगविरोधात एल्गार, गाळ काढण्याच्या नावाखाली भलतेच उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:42 IST

अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ह्या कुंभवली येथे होणाºया जेट्टीसाठी मेरिटाईम बोर्डाने मुरबे-सातपाटी खाडीत गाळ काढण्याच्या नावाखाली यांत्रिकी पद्धतीने ड्रेजिंगला परवानगी दिली होती. त्याच्या निषेधार्थ मुरबे ग्रामपंचायतीने सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करीत एकमताने ह्या विरोधात ठराव मंजूर केला.

- हितेन नाईकपालघर - अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ह्या कुंभवली येथे होणाºया जेट्टीसाठी मेरिटाईम बोर्डाने मुरबे-सातपाटी खाडीत गाळ काढण्याच्या नावाखाली यांत्रिकी पद्धतीने ड्रेजिंगला परवानगी दिली होती. त्याच्या निषेधार्थ मुरबे ग्रामपंचायतीने सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करीत एकमताने ह्या विरोधात ठराव मंजूर केला.मुरबे-सातपाटी खाडीत अनेक वर्षांपासून गाळ साचत असल्याने हा गाळ काढण्याची मागणी मच्छीमार सहकारी संस्था अनेक वर्षांपासून करीत असल्याचा फायदा उचलीत मे.अरोवाना कंपनीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाºयांना हाताशी धरून गाळ काढण्याच्या नावाखाली खाडीत यांत्रिक पद्धतीने ड्रेजिंग करण्याची परवानगी मिळवली होती. ती रद्द करण्यात यावी यासाठी मुरबे ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश तरे ह्यांच्या अध्यक्षते खाली मुरबे येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी जिल्हापरिषदेचे सदस्य सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंन मेर, उपसरपंच नंदकुमार तरे, माजी जिप सभापती प्रभाकर चौधरी, संस्था अध्यक्ष केडी पाटील, माजी सरपंच तरे आदी मान्यवरासह शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.मे. अरोवाना पोर्टस ह्या कंपनीस खाडीतील नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या नावाखाली ३१ जुलै २०१७ रोजी पाच वर्षाच्या कालावधी साठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डने परवानगी दिली असून खाडीतील ४.५ किलोमीटर लांब, ३० मीटर्स रु ंद, १.५ मीटर्स इतकी खोली प्राप्त करण्यासाठी ३ लाख ५० हजार घनमीटर गाळ काढण्याचे पत्र देण्यात आले आहे.या परवानगी विरोधात मुरबे, खारेकुरण सह किनारपट्टीवरील अनेक गावांत तीव्र पडसाद उमटत आहेत. शासनाच्या महसूल विभागाच्या ३ जानेवारीच्या परीपत्रका नुसार खाडीतील उत्खननासाठी ग्रामसभेची शिफारस आणि ग्राम दक्षता समितीची परवानगी घेण्याचे स्पष्ट नमूद असतानाही ती न घेतल्याचे सरपंच राकेश तरे ह्यांनी उपस्थित ग्रामस्थाच्या निदर्शनास आणून दिले.ह्या परवानगी विरोधात जिल्हापरिषदेच्या सभेत ठराव घेण्यात येऊन हे बंदराला दिलेल्या परवानगी चा जिप सदस्य सचिन पाटील ह्यांनी निषेध व्यक्त केला. एकदा अरोवाना कंपनीला परवानगी मिळाल्यास पुढे वाढवण, जिंदाल आदी बंदराचे भुते डोके वर काढणार असून अणुऊर्जा प्रकल्पानंतर जे हाल पोफरण, अक्करपट्टी वासीयांचे झाले तेच आपले होणार असल्याचे प्रमोद आरेकर म्हणाले.गाळ काढण्याच्या नावाखाली महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड ने दिलेल्या बेकायदेशीर परवानगीचा प.स. सदस्य जितेंन मेर ह्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री गप्प कसे एकही आमदाराने विधानसभेत ह्या विषयी कधीही तारांकित, लक्षवेधी प्रश्न उपस्थित न केल्याने संस्थेचे अध्यक्ष केडी पाटील ह्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.मासेमारी संकटामध्येपालघर पंचायत सामिती चे माजी सभापती मनोज संखे ह्यांनी ह्या जेट्टी बनविण्याच्या कामाला शिफारस पत्र दिल्याने त्यांचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.ह्या उत्खनना मुळे खाडीतील मत्स्यसंपदा, संरक्षित तिवरे, किनाºयावरील घरे, प्रवासी जेट्या ह्यांना धोका निर्माण होऊन मच्छीमार व्यवसाय संकटात सापडला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या