शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकधार्जिणा अर्थसंकल्प?, १६ मार्चला महासभेत होणार सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:04 IST

या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेचा हजारो कोटी बजेट असलेला शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे.

वसई : मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेचा हजारो कोटी बजेट असलेला शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चा होणार असून, १६ मार्चला महासभेत सादर केला जाणार आहे. यानंतर ३० मार्चला अंतिम टप्प्यात सुधारणा करून मंजुरी घेण्यात येणार आहे.स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत राऊत यांनी ही माहिती दिली. महापालिका प्रशासनाने याच वेळी परिवहनचाही ७३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला आहे. यात परिवहन नियंत्रण कक्ष, ई-बस सेवा, अत्याधुनिक परिवहन आगार अशा विविध घोषणा असलेल्या परिवहन समितीच्या साधारणपणे ७३ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीत चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक बससाठीही तरतूद करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे सादर केला. एकूण ७३ कोटी रु पयांच्या या अर्थसंकल्पावर चर्चा करून स्थायी समितीमार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या वर्षी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अगदी परिवहन खात्यात अनेक नवीन सुविधा आणि सुधारणा या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणण्याची विशेष घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने आपल्या अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.दरम्यान, महापालिकेची परिवहन सेवा खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाते. त्यामुळे बस प्रवासाला लागणारा अवधी, प्रवासी संख्या, बस कुठे पोहोचली किंवा कधी पोचेल अथवा यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी होत आहे.>३० मार्चला अंतिम टप्प्यात सुधारणा करून मंजुरी?वसई विरार शहर महानगरपालिका २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे शिलकी अंदाजपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना नुकतेच सादर केले. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत शुक्रवार दि. ६ मार्च रोजी चर्चा होणार आहे. काही शिफारशींसह १६ मार्च रोजी पालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर केले जाईल व त्यास ३० मार्चला अंतिम टप्प्यात सुधारणा करून मंजुरी घेण्यात येईल. मागील वेळी २२०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र या वेळी निवडणुका व विकासकामे बघता त्यात वाढ होईल, अशी शक्यता आहे.निवडणूक जवळ आली असता चारच दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत निघाली. यात महापालिकेचे बहुतांश प्रभाग व वार्ड यात आरक्षण बदलामुळे प्रस्थापित व दिगज्जांची डोकेदुखी वाढली असल्याने निदान अर्थसंकल्पामुळे तरी ही तूट भरून जाईल, अशी कुठेतरी आता आशा सत्ताधारी नगरसेवक यांना वाटते आहे. ज्येष्ठ नागरिक, कर्करोगग्रस्त, दिव्यांगांसाठी मोफत बसपास योजना असून यासाठी चार कोटी ८० लाखांची तरतूद केली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना बस डेपोलगत विश्रांतीगृह, उपाहारगृह यासाठी एक कोटीची तरतूद केली आहे. तर, अद्ययावत परिवहन भवनाच्या कामासाठी ३९ कोटींची तरतूद केली आहे.