शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिवसेनेचे आठ लोक चालतात, मग मनसेचे चार कार्यकर्ते का नाही?, अविनाश जाधव यांचा वसईत राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:40 IST

वसई पूर्व येथील वालीव कोविड सेंटर, तसेच इतर ठिकाणचे उपचार आदी प्रश्नांबाबत अविनाश जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची मंगळवारी भेट मागितली होती.

वसई/विरार : शिवसेनावाले आठ-आठ जणांना बरोबर घेऊन आयुक्तांशी चर्चा करतात, ते चालते; मग मनसेचे चार जण का चालत नाहीत, असा सवाल करीत मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी दुपारी राडा केला. या वेळी जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना शिवीगाळ केल्याने या आंदोलनाबाबत वसई-विरारमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.वसई पूर्व येथील वालीव कोविड सेंटर, तसेच इतर ठिकाणचे उपचार आदी प्रश्नांबाबत अविनाश जाधव यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांची मंगळवारी भेट मागितली होती. आयुक्तांनी केवळ दोनच लोकांना अनुमती दिल्याने अविनाश जाधव, इतर कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर पोस्टरबाजी केली.मनसेचे पदाधिकारी शिवाजी सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी लॉकडाऊनसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्या वेळीसुद्धा मनसेला दूर ठेवले गेले होते. शिवसेना नेते आयुक्तांना भेटतात, तेव्हा त्यांच्याबरोबर ८-१० जण तरी असतात. मग आम्ही चार जण चर्चा करणार असू, तर त्यात गैर काय आहे, असा सवाल जाधव यांनी केला. त्यावर आयुक्त अनुत्तरित राहिले.हा प्रकार तासभर सुरूच होता. या वेळी जाधव यांच्यासमवेत मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील, जयेंद्र पाटील, शिवाजी सुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी या वेळी धिक्कार आंदोलन केले.- आयुक्त गंगाथरन डी. यांनी हा प्रकार सुरू असेपर्यंत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मनसे पदाधिकाऱ्यांनी, खासकरून जाधव यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. याबाबत गुन्हा दाखल करणार का, असे विचारले असता आयुक्तांनी, मला मराठीतून कोणत्या शिव्या दिल्या त्या समजल्या नाहीत. मात्र मी व्हिडीओ पाहतो. चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.- शिवसेना आठ लोक ांना घेऊन आयुक्तांकडे कधीच बसली नाही. खरोखरच मनसेच्या जाधव यांना कोविड सेंटर व इतर प्रश्न सोडवयाचे असते, तर त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असती. त्यामुळे हा निवळ बालिशपणा आहे. शिवीगाळ करणे वगैरे गैरवर्तन आहे. जाधव व मनसेने हे केवळ प्रसिद्धीसाठी केलेले कृत्य आहे. - नीलेश तेंडुलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAvinash Jadhavअविनाश जाधव