शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या किनाऱ्यावर आढळली आठ जखमी कासवं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 21:58 IST

पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली.

अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी- पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली. ती ऑलिव्ह रिडले जातीची असून त्यांच्यावर पारनाका येथील कासव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू आहेत. सजग नागरिकांमुळे या जीवांना वाचविण्यात यश आले आहे.घोलवडच्या  किनाऱ्यावर जाळ्यात जिवंत कासवं आढळल्याची माहिती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक देसले यांना पालकांनी दिल्यानंतर त्यांनी कासव पुनर्वसन केंद्राला कळविले. या संस्थेचे प्रतीक वाहूरवाघ आणि रेमंड डिसोझा हे सदस्य खास कासवांकरिता बनविण्यात आलेल्या अॅम्ब्युलन्सने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  मासेमारीच्या नॉयलान जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना बाहेर काढून केंद्रात भरती केले. चिखले, मरवाडा किनाऱ्यावरही दोन कासवं असल्याची माहिती संतोष वरथाय  स्थानिकांनी दिल्यानंतर, टीमकडून रेक्यूचे काम सुरू असताना लगतच्या कांदळवनात भरत दुबळा या ग्रामस्थाला जाळ्यात अडकलेले कासव दिसले. या तिन्हीसह पारनाका किनाऱ्यावर आढळलेल्या अन्य एका कासवाला केंद्रात भरती करण्यात आले. तर शुक्रवारी चिंचणी किनाऱ्यावरून दोन कासवं रेस्क्यू केली होती. दरम्यान मागील एका महिन्याच्या कालावधीत एकूण पंचवीस जखमी कासवं आढळली असून त्यांच्या पंख, मान तसेच शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा आहेत.हे  देशातील पहिले तसेच एकमेव पुनर्वसन व उपचार केंद्र उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात चालविले जाते. मुंबईतील पशुवैद्य दिनेश विन्हेरकर येथे येऊन त्यांच्यावर उपचार करतात. त्यांची शुश्रूषा आणि आहाराचे  काम या प्राणीमित्र संस्थेकडून पहिले जाते. तंदुरुस्त झालेल्या कासवांना समुद्रात सोडण्यापूर्वी त्याची संपूर्ण लिखित नोंद ठेवली जाते. मागील एका महिन्यात 25 कासवं केंद्रात दाखल केली, त्या पैकी दोन मृत होती. प्रतिवर्षी हा आकडा वाढता असल्याचे या पुनर्वसन केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे या सागरी जिवाच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.