शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आंबे खा! पण वृक्षारोपणासाठी कोया ठेवा जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:47 IST

आंब्याच्या मौसमाला प्रारंभ झाला असून बाजारात विविध जातींचे आंबे उपलब्ध आहेत.

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : आंब्याच्या मौसमाला प्रारंभ झाला असून बाजारात विविध जातींचे आंबे उपलब्ध आहेत. या वर्षी स्थानिक फळांची विक्र ी ६० ते ७० रु पये प्रतिकिलोच्या दराने सुरू आहे. खवय्यांकडून त्याला चांगला प्रतिसादही लाभतो आहे. दरम्यान फळ खाऊन झाल्यानंतर त्याची कोय फेकून न देता त्याची, लागवड केल्यास त्यापासून रोपे तयार करून वृक्षारोपण करून पर्यावरण चळवळीला हातभार लावा, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.महाराष्ट्र, गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर आंबा लागवडीकरिता पोषक वातावरण असल्याने फळबागांची संख्या अधिक आहे. सध्या मे अखेर सुरू असून हा आंब्याचा मौसम समजाला जातो. स्थानिक फळं बाजारात दाखल झाली असून साधारणत: ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. ग्राहकांचीही त्याला मोठी मागणी आहे. फळं खाऊन कोय फेकून दिली जाते. मात्र तिची लागवड केल्यास पंधरवडयातच रोपे तयार होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोय कलम करून उत्तम प्रतीची कलमं तयार होतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्यांची माहिती नसते. शहरातील निवासी गृहसंकुलांमधून मोठ्या प्रमाणात कचऱ्यात ही कोय फेकली जाते. नर्सरी व्यवसाय करणाऱ्यांना कलमं बांधण्याकरिता त्याची आवश्यकता असल्याने, कचरा उचलणाºया सफाई कर्मचाºयांशी संपर्क साधून या कोया गोळा केल्या जातात, अशी माहिती समोर आली असून त्यांना प्रतिशेकड्यानुसार मोबदला दिला जातो. आंबा फळप्रक्रि या उद्योगकडूनही हा पुरवठा होत असल्याची माहिती नर्सरी व्यवसायिकांनी दिली.त्यामुळे शहरातील वा ग्रामीण भागातील नागरिकांनी या काळात कोया गोळा करून पावसाळ्यात त्याची रोपे आणि त्यानंतर कलमं बांधून घेतल्यास कमी खर्चात हे शक्य आहे. विविध शाळा, संस्था, ग्रामपंचायती आदींना कलमं भेट दिल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमेला हातभार लागेल. हे स्थानिक झाड असल्याने सुरु वातीची दोन-तीन वर्ष त्याचे संगोपन योग्य पद्धतीने झाल्यास भविष्यात उत्पन्न तर मिळेलच त्यासह बागायतींचे क्षेत्र वाढेल. शिवाय या झाडांमध्ये कार्बन डाय आॅक्साइडचे शोषण करण्याची क्षमता अधिक असल्याने वातावरण शुद्धीकरण होण्यास मदत होईल.>कोयींची उगवण झाल्यानंतर, कोय कलम बांधता येतं. त्यासह भेट कलम, शेंडा कलम, खुंटी कलम आदी प्रकार आहेत. ग्रामीण भागात अनेक कारागीर आहेत. नागरिकांनी इच्छाशक्ती दाखवल्यास वृक्षारोपण चळवळीला हातभार तर लागेलच शिवाय कलमं बांधणाºया कारागिरांच्या हाताला रोजगार मिळेल’- नारायण पटलारी (कलमं बांधणारा कारागीर, डहाणू)>‘स्थानिक आंबा बाजारात दाखल झाला असून ६० ते ७० रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्र ी सुरू असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.’- यज्ञेश सावे(आंबा बागायतदार)>‘गादीवाफ्यावर बी लागवडीनंतर, साधारणत: एक फुट उंचीची रोपे वाढल्यानंतर कलम तयार करण्यायोग्य होतात. ज्या आंब्याच्या जातीचे झाड हवे आहे, त्याचा परिपक्व शेंडा काडी रोपाच्या जाडीचा घेऊन त्यावर पाचर करुन प्लास्टिकच्या पट्टीने बांधावा, हे कलम सावलीत ठेवावे, त्यानंतरच्या काळात कलम लागवडीस तयार होते.’- उत्तम सहाणे(कृषी शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र)