शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आधी पुराने पिडले, आता सरकार छळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 03:26 IST

पंचनामे आणि मदतीचा फार्सच; नवघर ,माणिकपूर, दिवाणमानमधील नागरिक संतप्त

वसई : तालुक्या मध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी आणि त्या सोबतच पुराचे पाणी शिरल्याने नागरिवस्त्यांची दुर्दशा झाली होती. आठ दहा दिवसांनंतर कुठे जनजीवन रुळावर आले होते. यात हजारो कुटुबांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच व्यापारी संकुलामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे नुकसानीचा आकडा कोट्यवधीचा आहे. मात्र अद्यापपर्यंत अनेकांना नुकसान भरपाईचा छदामही मिळालेला नाही.वसईतील या पूर परिस्थितीची गंभीर दखल राज्य शासनाने वेळीच घेतली आणि पालघर जिल्हा प्रशासनाला तातडीने वसईतील नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे व त्यांच्या मालमत्तेचे पंचनामे करून त्यांना अनुदान कसे मिळेल याबाबतचे आदेश देऊ केले होते मात्र हे फक्त कागदी घोडे ठरले आहे.स्थानिक महसूल प्रशासनाने त्यानुसार वसईतील ग्रामीण भागासहित पालिका विभागस्तरावर घरोघरी फिरून प्रस्ताव ही तयार केले, मात्र, अद्याप ही वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील बहुतांशी विभागातील नागरिक खास करून काही आदिवासी पाड्यातील बांधव यांना हे अनुदान अद्याप मिळालेले नाही.याबाबात वसई विरार पालिकेच्या नगरसेविका पुष्पा जाधव यांनी वसईचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना एका लेखी पत्राद्वारे विचारणा केली असून गरजू व पिडीत नागरिकांना शासन नेमकी कधी व किती मदत करणार आहे. आणि यासाठी अजून किती वाट पहावी लागणार आह. या संदर्भात वसई प्रांताधिकाऱ्यांनी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.जाधव यांनी नवघर माणकिपूर शहरातील मौजे, नवघर, पं.दिनदयाळ नगर माणिकपूर दिवाणमान आणि तेथील कोंबडपाडा आदिवासी पाडयात जुलैमध्ये प्रचंड पाणी जमा होऊन हजारो लोकांची घरे, दुकाने व त्याच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले होते असे सांगितले आहे. त्यामुळे सामान्य, गोरगरीब आणि मध्यम वर्ग राहत असलेल्या या भागात अजूनही शासनाची मदतच पोचली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहेया शासन मदती बाबत वसई तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता सर्व पंचनामे पूर्ण झाले असून साधारण साडे अकरा हजारा पैकी जवळपास अर्धाहून अधिक धनादेश वाटप करण्यात आले असून उर्वरित वाटपाचे काम सुरु असल्याची माहिती (महसूल) नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी लोकमत ला दिली. दरम्यान, प्रत्यक्ष कागदावर होणारे पंचनामे आणि मिळणारी मदत पुरेशी आहे का हा संशोधनाचा मुद्या ठरत आहे. तात्काळा या क्षेणीतील मदत ही वेळेवर मिळत नाही अशी चर्चा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfloodपूर