शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉसने ११९८ मे. टन धान्याची, ५८८ कि. लीटर रॉकेलची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:58 IST

पालघर जिल्ह्यातील वास्तव : रेशनच्या धान्याचा काळा बाजार थांबला

हितेन नाईकपालघर : ई-पॉस मशीनद्वारे धान्य विक्री केल्यामुळे जिल्ह्यात धान्याचे पूर्ण नियंत्रन पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आणि धान्याच्या गैरव्यवहारास पूर्णत: आळा घालण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यात दरमहा १ हजार १९८ मेट्रिक टन धान्य तर ५८८ किलो लिटर्स रॉकेलची बचत करण्यात पुरवठा विभागाला यश आल्याने रेशन माफियांच्या घशात जाणारा साठा वाचवून त्यांनी शासनाचे लाखो रु पये वाचविण्यात यश मिळविले आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत शासनाने जिल्ह्यात मे २०१८ पासून ए ई पीडिएस लागू केली आहे. ती अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची केवळ आधार पडताळणी झाल्या नंतरच ई-पॉस मशीनद्वारे शिधा पत्रिकाधारकांना धान्याची विक्री केली जाते. या प्रणालीच्या अंमलबजावणी मुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याची विक्री करणे व धान्याच्या गैरव्यवहारास पूर्णत: आळा घालणे हे शासनाचे उद्दिष्ट यशस्वी होते आहे. या धोरणाची पालघर जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. एप्रिल २०१६ मध्ये जिल्ह्याचे १० हजार ५४१ मेट्रिक टन असलेले धान्य नियतन नोव्हेंबर २०१८ मध्ये ९ हजार ३४३ मेट्रिक टन म्हणजे ११९८ मेट्रिक टनाने कमी होऊन धान्याची बचत झाली आहे. तर दुसरी कडे जिल्ह्यात गॅस स्टॅम्पिंग मोहीम राबविल्याने एप्रिल २०१६ मध्ये ११८८ किलो लिटर्स केरोसीन ची गरज नोव्हेंबर २०१८ मध्ये कमी होत होत ६०० कि. ली. इतकी झाली आहे. ह्यात ५८८ कि.लि.ची बचत झाली आहे. शासनाने १ आॅगस्ट २०१८ च्या परिपत्रकान्वये गॅस जोडणी नसल्या बद्दल हमीपत्र सादर करणाऱ्या शिधा पत्रिकाधारकानाच केरोसीन चे वितरण करण्यात येत असल्याने त्याची मोठी बचत होत आहे.बोगस अथवा चुकीची हमीपत्रे सादर करून केरोसीन चा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २५ किलो तांदूळ, १० किलो गहू असा ३५ किलो धान्यसाठा प्रति २ रुपये किलो दराने दिला जातो. त्यांना वितरित करण्यासाठी २३ हजार २५०.५० क्विंटल तांदूळ आणि ९ हजार ३००.२० क्विंटल गव्हाचा साठा नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात वितरणासाठी उपलब्ध झाला असून ते काम सुरू आहे. वसई तालुक्यातील १९ हजार ६४३ कुटुंबातील सदस्यांना ३ हजार ५९९ शिधापत्रिकांचे, जव्हार तालुक्यातील ६८ हजार १४ सदस्यांना १२ हजार ६२९ शिधापत्रिकांचे, डहाणू तालुक्यात १ लाख १ हजार २५ सदस्यांना २० हजार १८३ शिधा पत्रिकांचे, मोखाडा तालुक्यात ४७ हजार २२२ सदस्यांना ९ हजार ९५१ शिधा पत्रिकांची, पालघर तालुक्यात ६३ हजार ७२७ सदस्यांना १५ हजार ३५६ शिधा पत्रिका, तलासरी तालुक्यात ५५ हजार ५९२ सदस्यांना ८ हजार ९११ शिधापत्रिका, वाडा तालुक्यात ४९ हजार २९६ सदस्यांना ९ हजार ७४२ शिधापत्रिका, विक्र मगड तालुक्यात ८६ हजार ३३० सदस्यांना १५ हजार ६६० शिधा पत्रिका असे पूर्ण जिल्ह्यात ४ लाख ९० हजार ८४९ सदस्यांना ९६ हजार ७३ शिधापत्रिका चे वाटप करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात २.८५ लाख शिधापत्रिकांचे वाटपवसई तालुक्यातील ५ लाख ९२ हजार ८५२ कुटुंबातील सदस्यांना १ लाख ३३ हजार ३३५ शिधापत्रिकां जव्हार तालुक्यात ५२ हजार १४७ सदस्यांना ९ हजार ५० शिधा पत्रिका, डहाणू तालुक्यात २ लाख ३७३ सदस्यांना ३५ हजार ६७० शिधा पत्रिका, मोखाडा तालुक्यात ३६ हजार ७१४ सदस्यांना ६ हजार ७२५ शिधापत्रिका, पालघर तालुक्यात ३ लाख ४७ हजार ६५७ सदस्यांना ६६ हजार ७९७ शिधापत्रिका, तलासरी तालुक्यात ६९ हजार ३०४ सदस्यांना १० हजार २३१ शिधापत्रिका, वाडा तालुक्यातील ९१ हजार ८७५ सदस्यांना १६ हजार ८३२ शिधापत्रिका, विक्रमगड तालुक्यात ३९ हजार ५८६ शिधापत्रिका असे जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३३ हजार ३०६ सदस्यांना धान्य मिळविण्यासाठी २ लाख ८५ हजार ६८२ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर