शशिकांत ठाकूर / कासाडहाणू तालुक्यात पाण्याच्या टंचाईमुळे पावसाचे पाणी अडविण्यासाठी वन व जलसंधारण विभागाने बांधलेले बंधारे कोरडे पडले आहेत. तालुक्याच्या कासा, वाणगाव भागातील काही गावांना उन्हाळयात सूर्या कालव्याअंतर्गत शेतीला पाणीपूरवठा होतो. त्याचा उन्हाळ्यात मोठा आधार असतो. परंतु डोंगराळ, धरण्याच्या वरच्या व धरणाच्या जवळील बऱ्याच गावांना कालव्यातून पाणी पूरवठा मार्चपासूनच बंद झाला आहे. या भागातील ओसरविरा, आवढाणी, करंजविरा, कांदरवाडी, धरमपूर, बापूगांव, गांगोडी, निंबापूर, सायवन, आष्टा, रायपूर, धुदलवाडी, आंबोली, शिसने, बहारे, गांगणगांव, आंबेसारी, नागझरी, गंजाड आदी ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात पाण्याची टंचाई असल्याने पक्के सिमेंटचे बंधारे बाधण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ठिकठिकाणी पाणी अडविण्यासाठी वनराई बांधारेही बाधण्यात आले आहेत. मात्र मे महिन्याआधीच सारे बांधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सूर्या धरण जवळ असूनही या गावपाडयांवरील नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. बंधारे पक्के सिमेंट काँक्रिटचे बांधलेले असतांनाही त्याच्यातून निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पाण्याची गळती होते. त्यामुळे काही बंधाऱ्यात पावसाळयानंतर एक दोन महिन्यात पूर्णपणे कोरडे पडतात.मोखाड्यातील पळसपाडा धरणाला गळती; रोज हजारो लीटर पाणी वाया मोखाडा : मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. घोटभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हाची परवा न करता आदिवासी महिला आपल्या कच्चाबच्च्यांसाठी मैलोंमैल भटकंती करतात. मात्र, पळसपाडा लगत असलेल्या वाघ धरणातून दुरूस्ती अभावी दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले भीषण पाणी टंचाईने ग्रासलेल्या २९ गावपाड्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच दिवसा गणिक टंचाई ग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पळसपाडा धरणात मुबलक प्रमाणात पाणी असुनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने मोखाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पळसपाडा धरणातून हजारो लीटर पाणी वाया माती मोल झाले आहे. या प्रकारामुळे आहे त्या योजनांची दुरावस्था आणि नव्यांच्या उभारणीची घाई असे चित्र दिसत आहे.मोखाडावासीयांची तहान भागवण्यासाठी १९९२-९३ मध्ये वाघ नदीवर पळसपाड्या जवळ हे धरण बांधण्यात आले. मात्र, तेव्हापासून अनेकदा दुरुस्त्या झाल्या मात्र दरवर्षी होणारी गळती कायम असल्याने स्ट्रक्चरल आॅडिटची गरज निर्माण झाली आहे. मुळ बांधकाम व मेंटनन्सवर लाखो रुपये खर्च होऊनही परिस्थिती बदलत नसल्योन आश्चर्य व्यक्त होत आहे. काही ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम तूटले आहेत. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणीसाठा होत नाही अशीही परिस्थिती आहे.
डहाणूत बंधारे पडले कोरडे
By admin | Updated: March 25, 2017 01:10 IST