शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पाणीटंचाईने चिंचणीत हाहाकार; योजनेच्या नूतनीकरणास चार वर्षांपूर्वी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:22 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

डहाणू : तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या साखरे, कवडास, धरणांत मुबलक पाणी साठा असतांनाही डहाणू पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने येथील ग्रामस्थांना तीन, चार, आठ दिवसांनी अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याने येथील महिलांवर ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील २६ गावांना तसेच पालघर बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथे साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो, परंतु जीर्ण व जुनाट झालेल्या बाडापोखरण योजनेचा सर्वत्र बोजवारा उडाल्याने पुरवठा व्यवस्थीत होत नसल्याने येथील महिलांना दुसऱ्या प्रभागात जाऊन पाणी भरावे लागते आहे. वीस हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी गावात सुमारे पाच हजार नळ कनेक्शनधारक असून येथील शेवटच्या टोकावर असलेले मोरीपाडा, रिफाई नगरी, भाटीपाडा, बारवाडा, इत्यादी प्रभागात पाणी येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे चिंचणी गावात काही मोठमोठया लोकांनी बेकायदेशीरित्या तीन, चार नळ कनेक्शन घेऊन केवळ एकच कनेक्शनचे पैसे ग्रामपंचातीला भरणा करीत असल्याने शिवाय ते पाण्याचा दुरूपयोग करीत असल्याने इतर नळकनेक्शन धारकांना त्याचा फटका बसून त्यांच्यावर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पाणीयोजना नूतनीकरणासाठी ४३ कोटी मंजूर करून ५ मार्च २०१४ ला या कामाची सुरूवात करण्यात आली. परंतु अनेक वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार कंपनी कडून बाडापोखरण योजनेचे काम अपूर्णच राहिले.

टॅग्स :Waterपाणी