शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमारांचे झाले मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 10:39 IST

पाच तास धुमाकूळ घातल्याने साचली पाण्याची डबकी

पालघर - जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे रोजी ध्वजारोहण सुरू असतानाच पावसाने पाच तास धुमाकूळ घातल्याने कार्यक्रम स्थळाजवळ पाण्याची डबकी निर्माण झाली, तर जिल्ह्यात पावसामुळे वीटभट्टी, सुके मासे यासह आंबा, जांभूळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांत १ लाख ४७ हजार ४२५ हेक्टर लागवडीचे क्षेत्रफळ असून, त्यातील १ लाख ४ हजार क्षेत्रावर भात, नागली, वेलवर्गीय भाजीपाला, फळे आदींची लागवड केली जाते. रविवारी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे तासभर पाऊस कोसळला होता. तर १ मे रोजी पालघरच्या पोलिस परेड ग्राऊंडवर  ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांना सुमारे दीड तास अडकून पडावे लागले होते. दुसरीकडे मिरची, पडवळ, कारली, भोपळी मिरची या भाजीपाल्याचे तर आंबा, काजू, जांभूळ आदी पिकांचे मोठे नुकसान होत झाडाखाली आंबा, जांभूळ या फळांचा मोठा सडा पडला होता. पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील फुल शेतीसह किनारपट्टीवर वाळत घातलेल्या बोंबील, मांदेली, करंदी आदींना मोठा फटाका बसला. त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  

चिखलामुळे वाहनचालकांना करावी लागली कसरतकार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या चारचाकी गाड्या चिखलात रुतून बसल्याने ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर मार्च महिन्यात पडलेल्या पावसाने फळे, फुले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उरलेल्या पिकाचे पुन्हा नुकसान झाल्याचे दिसून आले.