शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माणिकपूर पोलिसांच्या तपासामुळे प्रवाशाला परत मिळाला महागडा ४० हजार रुपयांचा मोबाईल फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 12:36 IST

पीडित प्रवाश्याकडून माणिकपूर पोलिसांचे आभार

माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक व तत्पर तपासामुळे जेष्ठ नागरिक रिक्षा प्रवाशाला परत मिळाला महागडा ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन

अवघ्या दोन तासांच्या आतच  केला तपास ; पीडित प्रवाश्याकडून माणिकपूर पोलिसांचे आभार

 

वसई :

- आशिष राणे

वसई : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ २ अंतर्गत वसई रोड स्टेशन भागातून प्रवास करताना रिक्षेत हरवलेल्या मोबाईलचा अवघ्या दोन तासांच्या आतच  छडा लावत त्या प्रवाशाला तो परत ही केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांच्या टीमने तांत्रिक व सतर्कता दाखवून केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे एका त्रस्त रिक्षा प्रवाश्याला त्याचा रिक्षेत हरवलेला ४० हजार रुपये किमतीचा आय फ़ोन मोबाईल परत मिळाल्यानं त्या प्रवाशी नागरिकाने माणिकपूर पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२४ मार्च रोजी संध्याकाळी उशिरा ७.१९ वाजताच्या दरम्यान पीडित  निरंजन देसाई (60 वर्षे) म्हणुन जेष्ठ नागरिक हे वसई रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरामध्ये एका रिक्षेतुन  प्रवास करीत असताना त्यांचा (आय फोन एस ई ) कंपनीचा ४० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल,  प्रवासी रिक्षात विसरल्यामुळे त्यांनी तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिस अधिकाऱ्याकडून मदत मागितली होती.

दरम्यान त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक तडवी यांनी त्यांच्या कडून संपूर्ण हकीगत माहीत करून घेतली आणि आपल्या सहकारी कर्मचारी व अधिकारी वर्गास या मोबाईल तपास विषयी मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे या तपासा दरम्यान  या मोबाईलचा अॅपल आयडी पासवर्ड उपलब्ध नसताना तसेच रिक्षा बाबत काही एक  उपयुक्त माहिती नसताना, देखील सदर रिक्षाचा व मोबाईलचा सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने या टीमनं शोध घेतला आणि अखेर रिक्षा व त्या चालकास शोधून काढले.

परिणामी रिक्षा व मोबाईल चा तपास लागताच निरंजन देसाई यांनी सुटकेचा निश्वास सोडला एकूणच पोलिसांनी सतर्कता दाखवून महागडा मोबाईल अवघ्या तासांत शोधून काढला हे कौतुकास्पद आहे. आणि यासाठी देसाई यांनी या तपासात सहकार्य करणारे  माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तडवी ,पोलीस नाईक प्रशांत पाटील व अन्य सहकारी तसेच संबंधित रिक्षा संघटना पदाधिकारी व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या चे   आभार मानले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसMobileमोबाइल