शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वादळसदृश्य परिस्थितीमुळे मच्छिमार नौका किनाऱ्यावर, मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 23:52 IST

समुद्रात ५ ते ९ ऑगस्ट ह्या चार दिवसात ६५ किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाने मच्छीमाराना इशारा दिला होता.

- हितेंन नाईक पालघर -समुद्रात  ५ ते ९ ऑगस्ट ह्या चार दिवसात ६५किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाने मच्छीमाराना इशारा दिला होता.किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वारे अश्या वादलसदृश्य वातावरणात आजही पालघर,वसई,डहाणू तालुक्यातील सुमारे एक ते दीड हजार बोटी समुद्रात असल्याने मच्छीमारांच्या घरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदी कालावधी संपला असला तरी समुद्रात निर्माण होणारी वादळे आणि तुफानी लाटांचे डोंगर अशी धोकादायक परिस्थिती अजूनही संपलेली नाही. त्यामुळे आजही मच्छीमारांच्या डोक्यावर समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा रुपी धोक्याची घंटा घोंगावतच आहे.

क्यार,महा आदी वादळामुळे आधीच संकटात सापडलेला जिल्ह्यातील मच्छिमारांच्या दोन हजार बोटी १ऑगस्ट पासून समुद्रात गेल्या आहेत.समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याने सावधानतेचा इशारा मच्छिमार संस्थांना देण्यात आल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील ह्यांनी लोकमत ला दिली.ह्या इशाऱ्या नंतर ही जिल्ह्यातील सुमारे दीड हजार बोटी आजही समुद्रात उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे.

किनारपट्टीवरून सुमारे आठ ते दहा तास दूरवरून किनाऱ्यावर येणे आणि पुन्हा मासेमारीला जाणे डिझेल च्या वाढत्या भाववाढीमुळे आणि कामगारांच्या पगारामुळे परवडत नसल्याने धोकादायक परिस्थितीत ही ह्या सर्व बोटी समुद्रात ठाण मांडून उभ्या असल्याचे एका मच्छीमाराने लोकमत ला सांगितले.माश्याचे प्रमाण अत्यल्प असताना आम्हाला पुरेसे मासे मिळालेले नाही त्यामुळे कर्ज काढून पहिलीच फेरी मासेमारीला गेलेल्या बोटीला मासेच मिळाले नाहीत तर मग पुढच्या फेरीसाठी डिझेल,बर्फ,कामगारांच्या पगारासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न मच्छिमार रजनीकांत पाटील ह्यांनी उपस्थित केला आहे.

आजही जिल्ह्याच्या झाई - बोर्डी ते वसई दरम्यानच्या ११०किमी किनारपट्टीवरील सुमारे एक ते दीड हजार बोटी समुद्रात असून ह्या वादळाचा तडाखा बसल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार