शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रब्बीचे नुकसान , बागायतदार, वीटभट्टी व मंडप डेकोरेटरर्सनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:23 IST

ओखी वादळाचा तडाखा वसईला बसला असून डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत .

पारोळ : ओखी वादळाचा तडाखा वसईला बसला असून डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत .या पावसामुळे रब्बी हंगामातील द्विदल पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे . रब्बीतील द्विदल पिके ही थंडीच्या मोसमातील पडणाºया दवबिंदूमुळे बहरतात. त्यामुळे या पिकांचे येथील शेतकरी कोणत्याही प्रकारे सिंचन करीत नाहीत . जमिनीतील ओलावा व रोज पडणारे दंव यांच्यावरच ही पिके जोमाने वाढतात . मात्र या पिकांच्या मुळाशी पाणी साठून राहिल्यास किंवा जास्त प्रमाणात ओलावा राहिल्यास मुळे कुजून जातात .या वर्षी ज्या प्रमाणे खरीप हंगाम परतीच्या पावसाने नुकसानीत घालवला तसाच सोमवार पासून या भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने रब्बी हंगामही वाया जातो की काय अशा चिंतेत शेतकरी आहेत . तसेच या पावसामुळे भाजी बागायतदारांची चिंता वाढवली असून मिरची,टोमॅटो ,दुधी,कारली , भेंडी, कांदे आदी पिकांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.शेती बरोबर येथील वीट उद्योगावर परिणाम झाला असून नुकत्याच करुन ठेवलेल्या कच्च्या विटांवर पाणी पडल्याने त्या विरघळल्या आहेत. लग्नसराई व मार्गर्शीष असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी डेकोरेटर्स मार्फत मंडप लावण्यात आले आहेत . अशा मंडपावर पाणी साचून ते उदध्वस्त झाल्याच्याही घटना घडल्या आहेत . तर अजूनही काही खळ्यात, खिरपात घेतलेल्या भात पिकांचे उडवे रचलेले आहेत ते पावसापासून वाचावेत म्हणून त्यांना ताडपत्रीद्वारे झाकण्यात आले आहेत . त्यांनाही ओलावा व दमट हवामानाचा त्रास होणार आहे.