शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाताबरोबर रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजावर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:00 IST

शेतकरी भयभीत : सोसायट्यांचे भूत मानगुटीवर बसणार

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. यावर्षी मात्र ऐन हंगामात पाऊस निघून गेल्याने भात पिकाबरोबर रब्बी हंगामही शेतकऱ्याच्या हातून निसटून गेल्याने शेतीसाठी घेतलेले सोसायट्यांचे कर्ज फेडायचे कसे या चिंतेने तो ग्रस्त झाला आहे.

भाता खालोखाल सुमारे १००० हेक्टर क्षेत्रात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये हरभरा, वाल, तूर, चवळी, तील, धने, मोहरी, उडीद, राई आदी पिके दरवर्षी घेतली जातात. यावर्षी मात्र पाऊस गेल्याने कडधान्याचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.

शिवाय येथे बारमाही वाहणाºया पाच नद्या आहेत. मात्र सिंचनाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने येथील शेतकºयाला आधुनिक शेती करता येत नाही. आजही तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो.

यावर्षी पाऊस गेल्याने भात शेती मोठ्या प्रमाणात करपून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी उभी पिके स्वत:च्या हाताने पेटवून दिलीत. तरी आणे वारी साठी प्लॉट निवडतांना जिथे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. उत्पन्न चांगले आहे. त्याचीच निवड केली. मात्र नियमाप्रमाणे हळवे, निमगरवे, गरवे अशा भाताच्या जाती घेणे बंधनकारक असतांना तसे न करता एकाच प्रकारचे उत्तम पिक येणारे भात घेऊन विमा कंपनीच्या फायद्यासाठी शेतकºयांची दिशाभूल करून फसवी आणेवारी जाहीर केल्याने. वाडा तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यात समाविष्ट होऊ न शकल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.विमा कंपन्यांसाठी दिला शेतकºयांचा बळीयासंदर्भात शेतकरी नेते प्रफुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. विमा कंपनीच्या फायद्यासाठीच प्रशासनाने शेतकºयांचा बळी दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली तर तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांच्याशी संपर्क साधला असता यावर्षी पाऊस लवकर गेल्याने रब्बी पिकांमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली असल्याचे सांगून रब्बीची एकूण किती पिके घेण्यात आल्याची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तसेच फोनवर घेतलेली प्रतिक्रि या प्रसिद्ध करू नये असे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी