शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेमुळे श्वानासह ३ नवजात पिल्लांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:43 IST

नायगाव पूर्वेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये मादी श्वान व तिच्या तीन नवजात पिल्लांचा विषबाधेमुळे तरफडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

वसई : नायगाव पूर्वेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये मादी श्वान व तिच्या तीन नवजात पिल्लांचा विषबाधेमुळे तरफडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या मादी श्वानाने नुकतीच पाच गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. त्यामध्ये विषबाधेमुळे तिच्यासह तीन पिल्ले मरण पावली असून दोन पिल्लांना वाचविण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे.नायगाव येथील गोकुळधाम सोसायटी ६ मध्ये ही मादि श्वान आपल्याला पिल्लांसह आश्रयाला राहत होती. परंतु आजबाजूच्या परिसरात टाकण्यात येणाऱ्या उघड्यावरील खाण्यातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती प्राणी मित्र मितेश जैन यांना मिळाली होती. सोसायटीमध्ये राहणाºया प्राणी मित्र निरु पमा रवींद्र यांना सोसायटीमध्ये राहणाºया काही नागरिकांनी ही पिल्ले हटविण्यास देखील सांगण्यात आले होते परंतु, ती पिल्ले न हटविल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत मृत्यू झालेल्या श्वान व पिल्लांना पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच याबाबत वालीव पोलीस ठाण्यात पशु क्रूरता कायदा १९६० च्या कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जेव्हा पोस्टमार्टेमचा अहवाल जेव्हा समोर येईल तेव्हा याबाबत अधिक माहिती समोर येईल असेही सांगण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ डॉक्टरांना बोलावून अत्यवस्थ दोन पिल्लांवर उपचार सुरु केल्याने दोन पिल्ले वाचली असल्याचे मतिेश जैन यांनी सांगितले आहे. मात्र या मुक्या प्राणांना मुद्दाम विषारी अन्न दिले गेले असल्याचा आरोप मितेश जैन यांनी केला आहे.

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यूVasai Virarवसई विरार