शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डेंग्यूच्या दहशतीमुळे गावपळण, बाळकापरा गाव झाले रिते, जव्हार रुग्णालयात १५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:17 IST

तालुक्यातील बाळकापरा गावातील डेग्यूची साथ वाढली असून जव्हार रुग्णालयातील लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर पोहचला आहे.

जव्हार : तालुक्यातील बाळकापरा गावातील डेग्यूची साथ वाढली असून जव्हार रुग्णालयातील लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर पोहचला आहे. यापैकी बाळकापरा गावातील धवळी देवू भोये (४०) या महिलेची रुग्णालयात उपचार घेतांना परिस्थिती अत्यंत खालावल्याने तिला नाशिकच्या रु ग्णालयात हलविण्यात आले आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डेंग्यूच्या या दहशतीमुळे गावकरी गावात थांबायला तयार नसल्याने गाव जवळपास रिकामे झाले आहे.बाळकापरा गावात एक डॉक्टर, दोन नर्स, वार्डबॉय अशी दिवसरात्र पथकाची नेमणूक करण्यात आली असून, रुग्णांवर गावात तात्काळ प्राथमिक उपचार करून त्यास जव्हारच्या रु ग्णालयात पाठविण्यात येते. गावातील साथीच्या आजाराची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्हा परिषद सदस्य गुलाब राऊत आणि माजी पं. स. सदस्य विनायक राऊत यांनी गावाची पाहणी करून रूग्णांवरील उपचाराची माहिती घेतली.या गावात आजही डेंग्यूची साथ सुरूच आहे. त्यामुळे बहुतेक गावकºयांनी गाव सोडले आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांनी बाळकापरा गावात वैद्यकिय उपचाराची पाहणी केली आहे. गावाच्या आजूबाजूच्या गावांना डेंग्यूची साथ पसरू नये, म्हणून बाजूच्या गावातील आजारी रुग्णांवरही उपचार करण्यात आल्याचे तेथील वैद्यकिय पथकाने लोकमतला सांगितले. त्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासून रुग्णांवर उपचार सुरु आहेत.बाळकापरा गावात डेंग्यूची लागण झाल्यावर ताप येणे, गुढग्यातील सांधे दुखणे, डोकेदु:खी, हातपाय चावणे, हिवतापा प्रमाणे थंडी भरणे असे लक्षणे असून, आजही या गावात रोजच चार ते पाच रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जव्हारच्या ग्रामीण रु ग्णालयात १५ साथीचे रु ग्ण उपचार घेत आहेत.बाळकापरा व कासटवाडी या ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन (धूर फवारणी यंत्र) वेळेच उपलब्ध न झाल्याने या साथीला पायबंद घालता आला नाही. या आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पाणी साठवून ठेवू नये आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.बाळकापरा गावातील पिण्याच्या पाण्याचे विहिरीचे पाणी तपासणीसाठी वेळोवेळी पाठवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच शनिवारीही डेंग्यूचे ३ संशियत रुग्ण आढळले आहेत.तातडीची पाहणीबाळकापरा गावाची व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थानांना साथीची लागण होवू नये तसेच बाळकापरा गावाची परिस्थिती नियंत्रणात यावी आणि शासनाच्या आरोग्य विभागाने लक्ष घालावे म्हणून जि. प. सदस्य गुलाब राऊत आणि माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत यांनी गावाला बाजूच्या गावांना तात्काळ भेट देवून पाहणी केली. जव्हारच्या कुटीर रुग्णांनालयातील रुग्णांची पाहणी करून औषधे व इतर उपचरासाठी आर्थिक मद्दत करण्यात आली.

टॅग्स :dengueडेंग्यूVasai Virarवसई विरार