शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत जावायाने केला सासूवर जीवघेणा हल्ला, जखमी सासूचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 21:41 IST

हत्येचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- दारूच्या नशेत जावायाने ६० वर्षीय सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. राजू पवार (३५) असे आरोपी जावायाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास विरारच्या गडगा पाडा येथे राहणाऱ्या वंदना पवार (३३) आणि त्यांची मुलगी घरातील अंथरुणावर झोपलेल्या होत्या. वंदना यांची आई रेश्मा दळवी (६०) ही त्यांच्याशेजारी जेवत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी राजू पवार (जावई) मद्यधुंद अवस्थेत येऊन पत्नी वंदना आणि सासू रेश्मा या दोघींना शिवीगाळ करत घरात आला. त्याने घराच्या पडवीला अडकवलेला चाकू काढून पत्नीवर चाकूने हल्ला करण्याच्या उद्देशाने धावला. तेव्हा शेजारी बसलेली सासू  तिच्या मदतीला धावली. त्यानंतर मद्यधुंद आरोपी राजू पवार याने सासूच्या मानेवर वार करून घटनास्थळावरून पळ काढला. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सासूला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान सासूचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पतीविरुद्ध मारहाण, खुनी हल्ला आणि धमकावल्याचा गुन्हा पत्नी वंदना पवार यांनी विरार पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. विरार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

सासुवर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी जावईवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून शनिवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपारा