शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तानसातील गायब हरणांचा ड्राेन कॅमेऱ्याद्वारे शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 23:36 IST

वनविभागाची माेहीम : अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आदेश

लाेकमत न्यूज नेटवर्कशेणवा : तानसा अभयारण्यात सोडण्यात आलेल्या चितळ प्रजातीच्या अचानक गायब झालेल्या २१ हरणांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली आहे. यासाठी वनविभागाला एका खासगी कंपनीची मदत घ्यावी लागली आहे. यासाठी एक तज्ज्ञाचे पथक कार्यान्वित झाले आहे.

उरण येथील नेव्ही कॅम्पमधील बंदिस्त २१ हरणांच्या कळपाला मुक्त संचार करता यावा, या उद्देशाने वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन तानसा अभयारण्यातील क्वारीचा पाडा येथे मुक्त सोडले होते. सुरुवातीला वनकर्मचारी व स्थानिक रहिवाशांना पाणथळी दिसणारा हा कळप अचानक दिसेनासा झाला. गायब झालेल्या या कळपाची माहिती वनविभागाला नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी तातडीने दखल घेऊन गायब हरणांचा शोध घेण्याचा व याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने व तानसा वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक मते यांना दिले आहेत. वनविभागाने यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेतली आहे.

चार ट्रॅप कॅमेऱ्यांची मदतnतज्ज्ञ व्यक्तींचे एक पथक येथे कार्यान्वित झाले असून हे पथक तानसा अभयारण्य व परिसरातील जंगलात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाणथळ अथवा खोल दऱ्या खोऱ्यातील दाट जंगलात चित्रीकरण करून हरणांचा शोध घेत आहे. nया हरणांचा शोध घेण्यासाठी चार ट्रॅप कॅमेरेदेखील बसविण्यात आले असल्याचे वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार