शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

डहाणूत वीज बेपत्ता, डायमेकर्स,उद्योजक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:28 IST

येथील पश्चिम किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावे, खेडोपाड्यातील वीज बेपत्ता झाल्याने डायमेकर्स, लघुउद्योजक व व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

शौकत शेखडहाणू : येथील पश्चिम किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावे, खेडोपाड्यातील वीज बेपत्ता झाल्याने डायमेकर्स, लघुउद्योजक व व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बोईसर तसेच चिंचणी सबस्टेशनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने या परिसरात काळोख पडला आहे. या भागातील वीजपुरवठा एक तासही सुरळीत राहत नसल्याने त्यांना तास न तास वीजेची प्रतिक्षा करावी लागत आहे. कारखान्यातील कामगारांना सुट्टी द्यावी लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महावितरणचा कारभार जैसे थे असल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या व्यवसायाची दयनीय अवस्था झाली आहे. डहणूच्या सागरी किनाºयावर असलेल्या चिंचणीपासून ते धाकली डहाणू वानगांव पासून अब्राहम, धूमकेत पर्यंतच्या सुमारे पन्नास गावांत डायमेकिंगसारखा ग्रामोद्योग आहे. शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता येथील हजारो सुशिक्षित तरूण डायमेकींगचा व्यवसाय करीत असतांना या परिसरात वीजपुरवठा सुरळित राहत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. सकाळी आठ वाजतापासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू असतांनाच बोईसर उपकेंद्रात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने सात, आठ तास वीज खंडित होण्याचे प्रकार दोन दिवसाआड घडत असल्याने येथील नागरिकही हतबल झाले आहेत. मात्र याकडे कोणताही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी किंवा नेतेमंडळी लक्ष देत नाहीत. तसेच ही समस्या सोडविण्यासाठी पुढे येत नसल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान एका बाजूला वीज निर्मिती करणारे थर्मलपॉवर स्टेशन दुसºया टोकावर तारापूर पॉवर स्टेशन आणि मधोमध असलेली गावे खेडोपाडे अंधारात खितपत आहेत. महावितरण कंपनी या परिसरात किती तास सुरळीत वीजपुरवठा होतो याबाबत कोणताही विचार न करता दरमहा दुप्पट, तिप्पट, बिले पाठवत आहे.