शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

शस्त्रक्रिया करताना पुरेसा रक्तसाठा नव्हता; ‘त्या’ महिलेच्या प्रसूतीपश्चात मृत्यूस डॉक्टर जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:55 IST

राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निर्णय : २१ लाखांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश. राष्ट्रीय आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाचे अध्यक्ष न्या. आगरवाल आणि डॉ. कांतीकर यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : दुर्मीळ रक्तगट असलेल्या महिलेची दुसरी सिझेरीन शस्त्रक्रिया करताना पुरेसे रक्त उपलब्ध न ठेवल्याने आणि प्रसूतीनंतर झालेला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी वेळीच आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने संबंधित महिलेच्या मृत्यूस नालासोपारा येथील ताते हाॅस्पिटलचे डॉ. राजेश ताते हे जबाबदार आहेत. त्यामुळे डॉ. ताते यांनी संबंधित महिलेच्या कुटुंबाला २० लाख रुपये नुकसानभरपाईपोटी आणि एक लाख रुपये दाव्याच्या खर्चापोटी द्यावेत, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे.

या प्रकरणात राज्य आयोगाने फेब्रुवारी २०१५ मध्ये डॉ. राजेश ताते यांच्या वैद्यकीय हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढून या महिलेच्या कुटुंबाला १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला डॉ. ताते यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात आव्हान देऊन ते स्वतः निरपराध असल्याचा दावा केला होता, मात्र राष्ट्रीय ग्राहक आयोगाने मूळ तक्रारदार आणि डॉ. ताते यांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे, राज्य आयोगाचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचे यासंदर्भातील अनेक निकाल लक्षात घेऊन डॉ. ताते यांचे अपिल फेटाळून लावले असून नुकसानभरपाईची रक्कम येत्या ६ आठवड्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

मयूरी ब्रह्मभट या महिलेने आपल्या दुसऱ्या प्रसूतीसाठी डॉ. राजेश ताते यांच्या नालासोपारा येथील हाॅस्पिटलमध्ये नाव नोंदवले होते. मयुरीची पहिली प्रसूती सिझेरीन शस्त्रक्रियेद्वारे झाली होती. तिचा दुर्मिळ रक्त गट असल्याची डॉ. ताते यांना पूर्वकल्पना होती. दरम्यान, २० सप्टेंबर १९९५ ला सकाळी ६.३० ला मयुरीला ताते हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सकाळी ९.३० वा. सिझेरीन शस्त्रक्रियेद्वारे मयुरीला मुलगी झाली, मात्र त्यानंतर तिला रक्तस्राव होऊ लागला. रक्तस्त्राव आटोक्यात येत नसल्याचे पाहून मयूरीच्या पतीने तिला ताबडतोब बोरिवलीच्या भगवती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्याची डाॅक्टरांना विनंती केली. तिथे सदर दुर्मीळ रक्ताची व्यवस्था केली आहे, असेही सांगितले. परंतु डॉ. ताते यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर दु. ३.३० वाजता मयूरीला भगवती हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने हा निर्णय फार उशिरा घेतला गेला. भगवती हाॅस्पिटलमध्ये मयूरी पोचली ती मृतावस्थेतच. या पार्श्वभूमीवर मयूरीचे पती सुश्रुत ब्रह्मभट यांनी राज्य ग्राहक आयोगापुढे १९९७ मध्ये डॉ. ताते यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली होती.

राष्ट्रीय आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाचे अध्यक्ष न्या. आगरवाल आणि डॉ. कांतीकर यांनी दिला आहे. ब्रह्मभट कुटुंबियांतर्फे ॲड. शिरीष देशपांडे आणि डॉ. अर्चना सबनीस यांनी राज्य आणि राष्ट्रीय आयोगात बाजू मांडली तर डॉ. ताते यांची बाजू ॲड. आनंद पटवर्धन यांनी मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय