शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या छायेने दिवाळी फिकी

By admin | Updated: November 14, 2015 02:00 IST

दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्व जाणुन ती परिपूर्ण साजरी करण्याकरीता सुगंधी उटणे, तेल, साबणापासून आकाशकंदील, उंची कपडे, मिठाई व पारंपारीक गोडधोड, दिव्यांची तोरणे

पंकज राऊत, बोईसरदिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्व जाणुन ती परिपूर्ण साजरी करण्याकरीता सुगंधी उटणे, तेल, साबणापासून आकाशकंदील, उंची कपडे, मिठाई व पारंपारीक गोडधोड, दिव्यांची तोरणे, नक्षीदार पणत्या, रांगोळ्या, ग्रीटींग कार्ड इ. बरोबरच सोने खरेदी आणि घरातील टी.व्ही. फ्रीज, ए.सी पर्यंत अगदी परिस्थितीनुरूप खरेदी करून दिवाळीचा सण वेगळ्या वातावरणात आनंदात वर्षानुवर्षे साजरा करण्यात येतो. यंदा मात्र, हा ट्रेंड थोडा बदलला. यावर्षी महागाई बरोबरच आर्थिक मंदीचे सावट दिसत होते. मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये थोडी खुशी जास्त गमच दिसत होती. ग्राहकांच्या पसंतीस उतरावे म्हणून प्रत्येक बारीक सारीक वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी खुप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी खरेदी करून दुकाने थाटली होती. दुकानांसमोर आकर्षक लायटींग करून ग्राहकांना आकर्षीत करण्याचाही प्रयत्न केला गेला.गुरुवारी भाऊबीज असली तरी मार्केट, व्यापारी पेठांमध्ये सर्व व्यापाऱ्यांमध्ये उत्साह कमीच दिसला. तर बोईसरमध्ये फटाक्यांची सुमारे पंचवीस दुकाने मुख्य रस्त्यालगत मोठ मोठी थाटली होती. त्यापैकी बहुसंख्य फटाके विक्रेत्यांकडे विक्री न झालेले फटाके मोठ्या प्रमाणात शिल्लक राहीले असून आता ते पुढील वर्षापर्यंत सुरक्षितपणे कुठे ठेवायचे या चिंतेत फटाके विक्रेते दिसले.मुळातच वाढलेली महागाई, मोजक्या कंपन्या सोडल्या तर कंत्राटी कामगारांना मिळालेला तुटपूंजा बोनस तर काही बोनस पासून वंचित राहीलेले कामगार महिन्याचा खर्च भागवताना करावी लागणारी कसरत, पाल्यांचा शिक्षणाचा वाढलेला खर्च व गरजा इ सर्व कारणांचा फटका व्यापाऱ्यांना बसला. तर ग्राहकांचा गरजेच्याच वस्तु खरेदीवर अधिक भर दिसल्याने एकंदरीत हातच राखुनच खरेदी झाल्याचे सर्वत्र दिसून आले.अनाथ मुलांसोबत पोलिसांची दिवाळी;कपडे, फराळ, मिठाईचे वाटपमनोर : मनोर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी यंदाची दिवाळी हलोली अनाथ आश्रम शाळेतील लहान मुलांबरोबर साजरी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांच्याहस्ते कपडे, फराळ तसेच मिठाई मुलांना वाटण्यात आली. तसेच काही निराधार वृद्धांनाही वस्तूंचे वाटप केले. सहा. पो. नि. मारोती पाटील, उपनिरिक्षक सोनावणे, मोहन पाटील आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.नागरीकांचे संरक्षण करणारे तसेच परिसरात कायदा - सुव्यवस्था ठेवणारे पोलीस क्वचितच मुलेबाळे, परिवारासह सण साजरा करतात. मात्र मनोर पोलीसांनी एक चांगला उपक्रम राबवत अनाथ मुलांनाच आपला परिवार समजत हलोली येथील स्वागत चॅरीटेबल ट्रस्टमधील मुलांसोबत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. (वार्ताहर)शिख समाजाची दिवाळी अंधारातच्वसई : शिख समाजाच्या पवित्र ग्रंथाचा अवमान झाल्याप्रकरणी शिख समाजाच्या वरिष्ठ धर्मगुरूंनी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वसईतील गुरूद्वारामध्ये शिख बांधवांनी काळे कपडे परिधान करुन अंधारात दिवाळी साजरी केली.च्दरवर्षी वसई पश्चिमेस असलेल्या अंबाडी रोड येथील गुरूद्वारामध्ये दिपावली सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गुरूद्वारावर दिव्याच्या माळा सोडण्यात येतात. तसेच पणत्या लाऊन गुरूद्वाराचा संपूर्ण परिसर उजळत असतो. परंतु यंदा शिख बांधवांनी कोणतेही उपक्रम राबवले नाहीत तसेच काळे कपडे घालून कीर्तनपाठ करण्यात आले. च्पवित्र ग्रंथाचा अवमान झाल्यामुळे शिख समाजात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करण्याकरीता शिखांच्या वरिष्ठ धर्मगुरूंनी यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याचे जाहीर केले होते.आदिवासी पाड्यावर दीपोत्सव; घोलवड पोलिसांचा उपक्रमबोर्डी : पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या झारली या दुर्गम आदिवासी पाड्यावर नवीन वर्षाच्या निमित्ताने गुरूवार १२ नोव्हेंबर रोजी घोलवड पोलीसांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. या उपक्रमाद्वारे पोलीस नागरीक समन्वय वृद्धीगत होण्यास हातभार लागेल अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.दिवाळीचे औचित्य साधून पोलीस, नागरीक संबंध वृद्धीगत करण्यासाठी घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोसबाडनजीकच्या झारली या पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यावर झालेल्या कार्यक्रमात आदिवासी बालगोपाळांशी सहाय्यक पोलीस निरिक्षक बांगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने संवाद साधत आदिवासी मुलांसह दिवाळी साजरी केली. यावेळी कुटूबापासून दुर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई, फटाके इ. वाटप केले. वाकी येथील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून बक्षीस वितरण केले. घोलवड येथे आयोजित कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्था राखून सण साजरा करण्याबाबत नागरीकांना मार्गदर्शन केले. यावेळी डहाणू पंचायत समिती सभापती चंद्रिका आंबात, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश अमृते आदींसह नागरीक उपस्थित होते. (वार्ताहर)