शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

शौचालयासाठी खड्डे खोदणारी ‘स्वच्छ भारत’ची जिल्हा अ‍ॅम्बेसेडर

By admin | Updated: February 12, 2017 03:09 IST

जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील सुशीला खुरकुटे हि महिला आपल्या शौचालयाचे दोन खड्डे एका लोखंडी पहरीच्या सहाय्याने तीन दिवसा पासून एकटीच खणत आहे

- हितेन नाईक,  पालघर

जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील सुशीला खुरकुटे हि महिला आपल्या शौचालयाचे दोन खड्डे एका लोखंडी पहरीच्या सहाय्याने तीन दिवसा पासून एकटीच खणत आहे. हागणदारी मुक्तीसाठी चाललेल्या तिच्या ह्या मेहनतीची दखल घेऊन तिची निवड ‘स्वच्छ भारत मिशन’ची पालघर जिल्ह्याची अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून केली आहे.केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशनला २ आॅक्टोबर २०१४ पासून सुरुवात केली.देशातील संपूर्ण ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत शौचालय असावे व त्याचा निरंतर वापर व्हावा हा त्याचा उद्देश आहे. पालघर जिल्हा परिषदेने १ लाख ४४ हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असून अजून त्यातील ७९ हजार शौचालये बांधण्याचे काम बाकी आहेत. त्यातच जव्हार, मोखाडा, वाडा, विक्र मगड हे तालुके १९ फेब्रुवारी पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकारी, कर्मचारी आणि जनता या सगळ्यांचे या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य लाभते आहे.१जव्हार तालुक्यात कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे सत्र सुरूच असल्याने व अस्वच्छतेमुळेही बालके मृत्युमुखी पडत असल्याचे सत्य आता जव्हारसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील महिलांना उमजू लागले आहे. हे रोखण्यासाठी जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत राजेवाडी गावातील सुशीला हनुमंत खुरकुटे या ३० वर्षीय महिलेला ग्रामपंचायती कडून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त झाले.मात्र विटा,सिमेंट,रेती,मजुरी ई. च्या खर्चा मुळे १२ हजार रु पयात शौचालयाचे काम पूर्ण होऊ शकत नसल्याने कुणाच्याही मदती शिवाय पहारीच्या सहाय्याने ती शौचालयाचे ५ फुटाचे खड्डे खणण्यासाठी तीन दिवसा पासून घाम गाळीत आहे.२जमीन खडकाळ असल्याने ती फोडण्यासाठी तिला अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. घरात आठराविश्वे दारिद्र्य अशा वेळी नवरा रोजगारासाठी दाहीदिशा फिरत असतांना आपल्या दोन तान्हुल्यांचा सांभाळ एकीकडे करीत असतांना दुसरीकडे ती हे खड्डेही खोदत आहे. यामुळे होणाऱ्या बचतीचे पैसे अन्य कारणांसाठी वापरता येतील असेही तिने म्हटले आहे. शौचालय बांधणीसाठी आपण स्वत: मेहनत करणार असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे ह्या महिलेच्या कार्यातून इतरांनीही काही प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.केंद्रीय स्वच्छता सचिवांनी केलेकौतुक सुशिल खुरकुटे यांनी केलेल्या कामाची दखल केंद्रिय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी घेऊन त्याचे टिष्ट्वटद्वारे कौतूक केले आहे.