शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

डहाणूचा रँचो! मोबाईलवरुन पशुधन पर्यवेक्षिका पत्नीचं मार्गदर्शन घेत गाईची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:35 IST

पत्नीकडून मोबाइलवरून मार्गदर्शन घेऊन गायीची सुखरूप सुटका करणारा शिक्षक तालुक्यात चर्चेचा विषय

डहाणू/बोर्डी : रस्त्याच्याकडेला असह्य प्रसूतीवेदनेने विव्हळणाऱ्या गायीची अवस्था पाहून नांदेडला असणाऱ्या पशुधन पर्यवेक्षिका पत्नीकडून मोबाइलवरून मार्गदर्शन घेऊन गायीची सुखरूप सुटका करणारा शिक्षक तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. आमीर खान यांच्या बहुचर्चित ‘थ्री इडियट’ चित्रपटातील या घटनेशी साम्य असलेला हा थरार शनिवारी डहाणू फोर्ट येथील मारु ती मंदिराजवळ सकाळी सातच्या सुमारास घडला.डहाणू फोर्ट येथील समाजसेविका उज्वला डामसे आणि लावण्या शेट्टी या शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. येथील मारुती मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला एक गाय प्रसूती वेदनेने विव्हळत असताना भटकी कुत्री तिला त्रास देत होती. त्यांच्या तावडीतून तिची सुटका करणाऱ्या त्या दोघींना पाहून जयवंत गंधकवाड हे जिल्हा परिषद रायतळी, गडगपाडा शाळेतील शिक्षक शाळेकडे जाताना थांबले. गुंतागुंतीच्या प्रसूतीवेदनेने मरणयातना सोसणाºया गायीला मदत करण्याचा विचार त्यांनी केला. याकरिता डहाणूतील त्यांच्या संपर्कातील पशुवैद्यकांशी मोबाइलवरून संंपर्क साधल्यानंतर, मदत मिळण्यास अपयश आले. याकरिता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे पशुधन पर्यवेक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी मीना उटलवाड यांच्याशी संपर्ककरून परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन गाईची प्रसूती सुरू झाली. मात्र वासराचे डोके आत मध्येच राहिल्याने शरीराबाहेर येण्यास अडथळा येत होता. अवधी उलटूनही यश न येता गायीची परिस्थिती बिकट होत असल्याने उपस्थितांची घालमेल वाढत होती. काहीही झाले तरी मागे न हटता सूचनांनुसार सुरू ठेवलेल्या शर्थीच्या प्रयत्ननांना यश आले. डोके आणि पाय दिसू लागताच शिक्षकांनी वासरू बाहेर ओढत गायीची सुखरूप सुटका केली.गायीच्या विण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. सकाळची वेळ असल्याने स्थानिक पातळीवरून मदत न मिळाल्याने पशुधन पर्यवेक्षिका असलेल्या पत्नीशी संपर्क साधला. त्यांनी आणि डॉ. कोठेकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाद्वारे हे कार्य सुरळीत पार पडले, त्याचे समाधान आहे.- जयवंत गंधकवाड, शिक्षक