शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत तुलसीविवाहाची लगीनघाई ; सोहळ्यात सेल्फीचा डिमांड, भटजींचाही मान मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:25 IST

कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत.

बोर्डी : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. गतवर्षी नुकताच जाहीर झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाने तुलसी विवाह कार्यक्र मावर निरु त्साहाचे वातावरण होते.कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत समाजरीतीनुसार तुलसी विवाह लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात तिन्ही सांजेनंतर तुलसी विवाह लावला जातो. त्यामुळे या वेळी पंत्या आणि आकाशकंदिलाच्या रोषणाईने परिसर प्रकाशित झालेला दिसतो. तुलसी वृंदावना भोवती गेरू किंवा शेणाचा सडा घोलून रांगोळी काढली जाते. ऊसाच्या कांड्यांच्या मंडपाला फुलांच्या माळांनी सजविण्यात येते. बहुतेक ठिकाणी सुवाशींनीकडून विवाह लावण्याची प्रथा आहे. या करीता तुळशीला फुलं वा मोत्यांच्या मुंडावळ्या घालून ओटी भरली जाते. बाळकृष्णाची मूर्ती किंवा कृष्ण म्हणून उसाचे कांडे प्रतिकात्मक उभे ठेऊन आंतरपाट धरला जातो. पूर्वी तोंडाने तर हल्ली इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली मंगलाष्टके मोबाईलद्वारे या वेळी वाजविली जात आहेत. या वेळी कार्यक्र मानंतर शिरा, फराळ तसेच आवळा, शिंगाडा, नारळ आदि. फळांचा प्रसाद वाटला जातो.दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त महिलांप्रमाणेच बच्चेकंपनी सेल्फी आणि ग्रुप फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याने सद्या तुलसी विवाहाची चर्चा रंगताना दिसत आहे. गतवर्षी तुलसी विवाह काळात नोटाबंदीच्या निर्णयाचे गालबोट सोहळ्याला लागल्याने उत्साहाचा आनंद लुटता आला नव्हता. पैशांची चणचण आणि व्यवहारातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी दिवसभर उभे राहणे या सर्व गोष्टीचा परिणाम तुलसी विवाह या सणावर झाल्याच्या कटू आठवणी लोकमतकडे बोलून दाखवल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार